AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील मुरूमासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा, होतील अनेक फायदे !

प्रदूषणाचा सरळ परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यानिर्माण होतात.

चेहऱ्यावरील मुरूमासाठी 'हे' घरगुती उपाय करा, होतील अनेक फायदे !
स्क्रब
| Updated on: Apr 19, 2021 | 6:14 PM
Share

मुंबई : प्रदूषणाचा सरळ परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक आैषधे घेऊन सुध्दा त्वचेचा समस्या दूर होत नाहीत. त्यामध्ये अनेक जणांना चेहऱ्यावरील मुरुमाची मोठी समस्या असते. अनेक आैषधे घरगुती उपाय देखील करून त्यांच्या चेहऱ्यावरचा मुरुम जात नाही. नुसते आैषधे घेऊन हा मुरुम जात नाही तर यासाठी काही घरगुती उपाय करावे लागते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील मुरूम घालू शकता. (Special tips to get rid of pimples on the face)

-चंदनाची पावडर, हळद आणि गुलाब पाणी घ्या. हे सर्व व्यवस्थित मिक्स करा याची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. साधारण 20 ते 25 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा अशाप्रकारे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल.

-मध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीइन्फ्लेमेटरी असते. ज्यामुळे मुरुम कमी होण्यास मदत होते. मुरुमावर एक-दोन थेंब मध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा.

-आहारात जास्त तेलकट पदार्थांचा समावेश केला तर चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे आहारात शक्यतो तेलकट पदार्थ घेणे टाळाच

-आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. चेहऱ्यावरील मुरुमामुळे तुम्ही त्रस्त असाल तर कोरफडचा रस आपल्या चेहऱ्याला लावा आणि 20 ते 30 मिनिटे तसेच ठेवा.

-केळी अगोदर चांगली मॅश करा नंतर दोन चमचे दही आणि एक चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे सतत केले तर आपल्या चेहऱ्यावरील मुरुम नाहीसे होतील.

-कच्चा मध हा मुरुमासाठी एक नैसर्गिक पर्याय आहे. यामध्ये बॅक्टेरिया नष्ट आणि प्रतिबंधित करण्याचे गुणधर्म आहेत. मुरुमावर रात्रभर थोडा शुद्ध मध लावा. तसेच तो पाण्यात मिसळून आपण क्लीन्झर म्हणून देखील वापर करू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

संबंधित बातम्या : 

(Special tips to get rid of pimples on the face)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...