Strawberry Benefits | हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या त्यांच्याविषयी…

| Updated on: Jan 30, 2021 | 1:15 PM

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे अँटी-ऑक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात असतात.

Strawberry Benefits | हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या त्यांच्याविषयी...
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते.
Follow us on

मुंबई : हिवाळ्यात बरीच फळे बाजारात विक्रीस येतात. या काळात हंगामी फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण त्यात बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, असे नेहमी म्हटले जाते. स्ट्रॉबेरी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असते आणि डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात या मधुर बेरी आपल्यापर्यंत पोहोचतात. जर आपण हिवाळ्याच्या काळात आपण आपल्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश केला तर ते आपल्या शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमच्या शरीराला बरेच फायदे मिळतात (Strawberry Benefits during winter season).

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे अँटी-ऑक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात असतात.

स्ट्रॉबेरीचे फायदे :

– त्यात सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे.

– स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी 9 असते.

– रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील हे फळ चांगले मानले जाते आणि म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी खाणे आवश्यक आहे.

– जर आपण ताजे स्ट्रॉबेरी घेऊ शकत असाल, तर ते चांगले आहे. कारण स्ट्रॉबेरीचे सेवन आपल्याला हृदयरोग आणि मधुमेहपासून मुक्त करू शकते.

– आपण कोणत्याही प्रकारे स्ट्रॉबेरी खाऊ शकता, परंतु या हंगामात ते आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे (Strawberry Benefits during winter season).

आपल्या आहारात कसे सामील कराल?

जर आपल्याला आपल्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करू इच्छित आसल तर कोणतीही समस्या नाही. आपण हे संपूर्ण फळ खाऊ शकता किंवा त्याचे फ्रुट सलाड बनवून देखील खाऊ शकता. आपल्याला आवडत असल्यास, स्ट्रॉबेरी स्मूदीमध्ये टाकून किंवा त्याचा मिल्कशेक बनवून देखील पिऊ शकता.

फायदे आणि तोटे

या हंगामात स्ट्रॉबेरी खाण्याने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. तसेच त्याचे बरेच तोटे देखील आहेत. आपण आवश्यकतेपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास ते आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढवते. कारण त्यात नैसर्गिक साखर असते. म्हणून जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. या फळात अधिक प्रमाणात कीटकनाशके असू शकतात. तथापि, हे सर्व काही ते कुठे पिकले आहे, यावर अवलंबून आहे. म्हणूनच योग्यप्रमाणात आणि मर्यादित स्वरुपात त्याचा वापर केला पाहिजे.

(Strawberry Benefits during winter season)

हेही वाचा :