नवरोबाही बायकांना लहान मुलांएवढाच त्रास देतात : सर्व्हे

| Updated on: Jun 20, 2019 | 8:29 PM

तुमचे पती हे लहान मुलांसारखे वागतात, लहान मुलांप्रमाणे तुमचा तणाव वाढवतात, असं तुम्हाला वाटतं का? जर असं असेल, तर तुम्ही अगदी बरोबर आहात. कारण, जगातील बहुतेक महिलांना असंच वाटतं. हे आम्ही नाही, तर एका सर्व्हेमधून पुढे आलं आहे.

नवरोबाही बायकांना लहान मुलांएवढाच त्रास देतात : सर्व्हे
Follow us on

मुंबई : महिलांनो, काय तुमचे पतीदेव तुम्हाला लहान मुलांप्रमाणे त्रास देतात? कुठलंही काम सांगितलं किंवा कुठली जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली, की ते टाळाटाळ करतात? तुमचे पती हे लहान मुलांसारखे वागतात, लहान मुलांप्रमाणे तुमचा तणाव वाढवतात, असं तुम्हाला वाटतं का? जर असं असेल, तर तुम्ही अगदी बरोबर आहात. कारण, जगातील बहुतेक महिलांना असंच वाटतं. हे आम्ही नाही, तर एका सर्व्हेमधून पुढे आलं आहे.

‘टुडे डॉट कॉम’ या वेबसाईटच्या सर्व्हेनुसार, महिलांना त्यांचे पती त्यांच्या मुलांइतकंच टेंशन देतात. हा सर्व्हे विवाहित महिलांच्या जीवनातील अती ताणावर करण्यात आला होता. यामध्ये जवळपास सात हजार महिलांची मतं नमुद करण्यात आली. यावेळी त्यांना त्यांच्या जीवनातील तणाव, घरातील कामाचं वितरण आणि त्यांचं पती आणि मुलांसोबतचं जीवन यावर प्रश्न विचारण्यात आले.

या सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्यांपैकी 46 टक्के महिलांनी त्यांचे पती त्यांना मुलांपेक्षा जास्त टेंशन देत असल्याचा दावा केला. यामध्ये महिलांची तणावाची सरासरी पातळी ही 10 पैकी 8.5 टक्के असल्याचं समोर आलं.

पतीमुळे तणाव वाटत असेल, तर काय कराल?

जर, तुम्हाला तुमच्या पतीमुळे तणाव जाणवत असेल, तर तुम्ही याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी. अती तणावाचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याबाबत तुमच्या पतीसोबत चर्चा करा. घरातील सर्व कामे उदा. घरातील किराना, भांडी घासणे, जेवण बनवणे, कपडे धुणे, मुलांना अभ्यासात मदत करणे आणि इतर घरगुती कामे वाटून घ्यायला हवी. शेअरिंग आणि केअरिंग, म्हणजेच प्रत्येक गोष्ट शेअर करणे आणि एकमेकांची काळजी घेणे हाच सुखी विवाहित आयुष्याचा मंत्र आहे.

घरातील सर्व कामं आणि मुलांचा सांभाळ याची जबाबदारी एकट्या महिलेवर असते, हे सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक चारपैकी एका महिलेने मान्य केलं. तर अनेकांनी त्यांना त्यांच्या पतीकडून हवी ती मदत मिळत नसल्याची तक्रारही केली. तसेच, पतीचे काम वेळेवर झाले नाही तर ते लगेच तक्रार करत असल्याचंही अनेक महिलांनी सांगितलं. तुमच्यापैकी अनेकांनाही असंच वाटत असेल.

त्यातच ज्या महिला एकट्या आपल्या मुलांचा सांभाळ करतात. त्यांच्या तणावाची पातळी ही इतर महिलांपेक्षा जास्त असल्याचंही या सर्व्हेत दिसून आलं.

संबंधित बातम्या :

जास्त वेळ एकाच जागी बसणाऱ्यांना ‘या’ आजारांचा धोका

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

‘या’ पाच कारणांमुळे इच्छा नसतानाही महिला रिलेशनशीपमध्ये राहतात