यूपीच्या ‘या’ मुलीच्या सौंदर्याचीच सर्वत्र रंगतेय चर्चा…जाणून घ्या, का होतेय तिची इतकी चर्चा? कोण आहे ही सुंदरी!

सिनी शेट्टीने नुकताच मिस इंडिया-2022 चा खिताब जिंकला आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशची शिनाता चौहानही सेकंड रनर अप बनून चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर शिनाताचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत कारण ती मिस इंडिया 2022 स्पर्धेत दुसरी उपविजेती होती.

यूपीच्या ‘या’ मुलीच्या सौंदर्याचीच सर्वत्र रंगतेय चर्चा…जाणून घ्या, का होतेय तिची इतकी चर्चा? कोण आहे ही सुंदरी!
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 4:02 PM

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन (World Convention) सेंटरमध्ये हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. जिथे मिस इंडिया आणि रनर अप घोषित झाले. सिनी शेट्टीने नुकताच मिस इंडिया-2022 चा खिताब जिंकला आहे. तर, उत्तर प्रदेशची शिनाता चौहानही सेकंड रनर अप बनून चर्चेत आली आहे.  शिनाता 22 वर्षांची असून तिचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे. तर,शिक्षण दिल्लीतून झाले. सध्या शिनाता मॉडेलिंग प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने (For modeling projects) दिल्लीत राहत आहे. शिनाताने तिचे शालेय शिक्षण दिल्लीतील केंब्रिज स्कूलमधून केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. शिनाताची उंची ५ फूट ७ इंच आणि वजन ५३ किलो आहे. शिनाता सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार आहे. तिने सात वर्षांहून अधिक काळ आपल्या शाळेत अव्वल राहून 10 वी CBSE बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले. शिनाता हिने गणित आणि विज्ञान (Mathematics and Science) ऑलिम्पियाडमध्ये पदकेही जिंकली आहेत. एवढेच नाही तर तिची सांस्कृतिक सचिवपदीही निवड झाली आहे.

शिनाताने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली आणि मिस टीन इंडिया एक्सक्झिटचा खिताब जिंकला. तिने यूएसए मधील एक्सक्झिट इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले, जिथे तिला प्रथम उपविजेतेपदाचा मुकुट देण्यात आला.शिनाताने मिस इंडियाच्या 58 व्या मालिकेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे जिथे ती दुसरी उपविजेती होती. 2019 मध्ये, तिने प्रथमच फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि टॉप 6 मध्ये आपले स्थान निर्माण केले. अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. इंस्टाग्रामवर तिचे २६.४ हजार फॉलोअर्स आहेत. शिनाताने तिच्या अकाऊंटवर तिचे अनेक उत्तम फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. शिनाताच्या या सुंदर चित्रांना भरपूर लाइक्स आणि कौतुकास्पद कमेंट्सही मिळतात. अनेक युजर्सनी तिला कमेंट्समध्ये पुढची मिस युनिव्हर्स असल्याचेही सांगितले आहे.

आईचे स्वप्न केले पूर्ण

शिनाताला तिच्या वडिलांसारखे व्हायचे आहे. ती म्हणाली की, तिचे वडील खूप हुशार आणि प्रामाणिक आहेत. तिचा त्याच्यावर आणि त्याच्या मूल्यांवर खूप विश्वास आहे. शिनाता सांगते की, तिचे तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. शिनाता महिलांना आत्मविश्वास बाळगण्याचा सल्ला देते. ती म्हणते की स्त्रीने प्रथम स्वतःची आणि तिची किंमत जाणून घेतली पाहिजे. शिनाताच्या आईलाही मॉडेलिंग करायचे होते. तिला 1994 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घ्यायचा होता. मात्र काही कारणास्तव ती तिचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही. आता त्यांची मुलगी हे स्वप्न पूर्ण करत आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.