Remedies for fever : ताप आल्यानंतर या गोष्टी अजिबात करु नये, अन्यथा वाढू शकतात अडचणी

Fever Home remedies : हिवाळ्यात सर्दी किंवा फ्लू सारखी संसर्गजन्य आजार वाढतात. ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे ते लोकं लगेच आजारी पडतात. अशा परिस्थितीत ताप आल्यानंतर योग्य आहार घेणे फाय गरजेचे असते. जाणून घ्या ताप आल्यावर काय करावे आणि काम करु नये.

Remedies for fever : ताप आल्यानंतर या गोष्टी अजिबात करु नये, अन्यथा वाढू शकतात अडचणी
| Updated on: Jan 06, 2024 | 7:45 PM

Fever : हिवाळा सुरु झाला की अनेकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात रोग प्रतिकारशक्ती देखील कमी होते. संंसर्गामुळे अनेकांना ताप येतो. त्यामुळे यावेळी अधिक काळजी घेतली पाहिजे. ताप आल्यावर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. पण असे करु नये. ताप आल्यावर योग्य आहार घेतलाच पाहिजे. आयुर्वेदानुसार ताप आल्यावर काय करावे आणि काय करु नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ताप, सर्दी किंवा खोकला अनेकदा हिवाळ्यात डोकं वर काढतातच. हवामानातील बदल आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण आजारी पडतो. ताप असताना कधीही निष्काळजीपणा करु नका. तापावर वेळीच नियंत्रण ठेवा. ताप असताना योग्य आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

ताप आल्यावर काय करू नये

थंड पाणी टाळा

ताप आल्यावर अंघोळ करु नये. ओल्या कपड्याने तुम्ही अंग पुसुन घेऊ शकता. थंड पाण्याने अंघोळ करण्याची चूक अजिबात करु नये. कोमट पाण्याने अंग पुसुन घ्यावे. पण २-३ दिवस आंघोळ केल्याशिवाय राहता येत असेल तर आंघोळ करणे टाळावे.

ताप असताना काही फळे खाणे देखील चुकीचे ठरु शकते. कोणती फळे खावीत आणि कोणती फळे खाऊ नयेत हे तुम्हाला माहित हवे. ताप आल्यानंतर तुम्ही रसदार फळे खाऊ नयेत. या शिवाय आंबट फळे खाणे देखील टाळावे. केळी, टरबूज, संत्री आणि लिंबू ही फळे देखील खावू नयेत.

व्यायाम करु नये

तुम्हाला जर ताप आला तर व्यायाम अजिबात करू नका. व्यायाम करताना शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे नुकसानही होऊ शकते. ताप असताना शरीर कमजोर होऊ लागले तर व्यायाम करणे टाळावे.

दही खाणे टाळावे

ताप आल्यावर तुम्ही दही देखील खावू नये. तापात दही, ताक, लस्सी, रायता खाणे टाळावे.

ताप आल्यावर काय करावे

ताप आल्यानंतर आधीतर आहाराची विशेष काळजी घ्यावी. हलके पचायला सोपे असे पदार्थ खावे. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहिल. तापात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. ताप आल्यानंतर तुम्ही सूप पिऊ शकता. तुम्ही टोमॅटो सूप, मिक्स्ड व्हेज सूप किंवा मूग डाळ सूप पिऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे ताप आल्यानंतर जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी. वेळेवर झोपल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. ताप आल्यानंतर शरीर कमजोर होऊन जाते. त्यामुळे अवघड काम करणे टाळावे.