AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरात्रीच्या उपवासात कुट्टूचं पीठ वापरताय? भेसळ ओळखण्यासाठी मदत करतील ‘या’ टिप्स

अनेक लोक नवरात्री उपवासात कुट्टूचे पीठ खातात. पण तुम्ही वापरत असलेले पीठ शुद्ध आहे की भेसळयुक्त, हे तपासण्यासाठी या काही टिप्स तुमची मदत करतील.

नवरात्रीच्या उपवासात कुट्टूचं पीठ वापरताय? भेसळ ओळखण्यासाठी मदत करतील ‘या’ टिप्स
| Edited By: | Updated on: Oct 13, 2026 | 5:14 PM
Share

नवरात्रीच्या काळात देवीची पूजा, आराधना करण्यासोबतच अनेक भक्त ९ दिवस उपवास करतात. नवरात्रीच्या उपवासात फक्त साबुदाणा, राजगिरा पीठच नाही तर अनेक लोक कुट्टूचे पीठाचा देखील वापर करतात. कुट्टूच्या पिठात असलेले फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण या कुट्टूच्या पिठात जर भेसळ असेल किंवा ते जुने व खराब झालेले असेल तर ते आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान करू शकते. त्यामुळे उपवासासाठी कुट्टूचे पीठ खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे. काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही पिठाची प्राथमिक तपासणी करू शकता.

रंगावरून ओळखा

कुट्टूच्या पिठाची गुणवत्ता तपासताना सर्वप्रथम त्याच्या रंगाकडे लक्ष द्या. पिठाचा रंग त्याच्या प्रकारानुसार आणि प्रक्रियेनुसार बदलू शकतो. मात्र, पिठात अचानक असामान्य रंग दिसत असेल, हिरवट किंवा राखाडी डाग असतील अथवा बुरशीसारखी चिन्हे दिसत असतील, तर ते पीठ वापरणे टाळा.

पाण्याच्या मदतीने करा प्राथमिक तपासणी

कुट्टूच्या पिठात भेसळ आहे का, याची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एका पारदर्शक ग्लास घ्या. अर्धा ग्लास पाण्याने भरा. आता त्यात एक चमचा पीठ टाकून मिश्रण नीट ढवळा. त्यानंतर पिठाचे कण कसे पसरतात किंवा खाली बसतात, हे पाहा. पिठात कोणत्याही प्रकारची भेसळ केली असेल तर इतर गोष्टी पाण्यात तरंगायला लागतात आणि पीठ खाली स्थिरावते.

पॅकेटवरील लेबल काळजीपूर्वक वाचा

बाजारातून पॅकबंद कुट्टूचे पीठ खरेदी करताना पॅकेटवरील एफएसएसएआय (FSSAI) परवाना क्रमांक, उत्पादनाची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख आणि घटकांची माहिती तपासा. पॅकेट व्यवस्थित सीलबंद आहे का, याचीही खात्री करा. मुदत संपलेले किंवा माहिती अपूर्ण असलेले पीठ खरेदी करणे टाळा.

पीठ मळताना त्याचा पोत तपासा

कुट्टूच्या पिठापासून पदार्थ बनवताना त्याचा पोत आणि वास लक्षात घ्या. पीठ नेहमीच्या तुलनेत वेगळे दिसत असेल, त्याला आंबूस किंवा बुरशीसारखा वास येत असेल, तर ते वापरू नका. मळताना पीठ विखुरले तर पीठात भेसळ झाली आहे. लक्षात ठेवा की शुद्ध कुट्टूचे पीठ कधीही विघटित होत नाही.

Follow Us
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात