AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dasara 2026: दसऱ्याला करा 10 मिनिटांत मेकअप, चेहऱ्याला मिळेल फ्लॉलेस, परफेक्ट लूक

Makeup in 10 Minutes: दसऱ्याच्या सणाला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला खास तयारी करतात. मात्र, मेकअपसाठी जास्त वेळ देण्याची गरज नाही. फक्त १० मिनिटांत सोप्या पद्धतीने मेकअप करून तुम्ही फ्लॉलेस आणि परफेक्ट लुक मिळवू शकता.

Dasara 2026: दसऱ्याला करा 10 मिनिटांत मेकअप, चेहऱ्याला मिळेल फ्लॉलेस, परफेक्ट लूक
make upImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 19, 2026 | 1:46 PM
Share

सणासुदीत प्रत्येक महिलेला सुंदर आणि आकर्षक दिसावे असे वाटते. या दिवशी खास पारंपरिक कपडे, दागिने आणि मेकअप करून महिला तयार होतात. मात्र, मेकअप करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची किंवा खूप वेळ घालवण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी अवघ्या १० मिनिटांत फ्लॉलेस आणि परफेक्ट लुक मिळवू शकता. मेकअप करताना त्वचेची योग्य तयारी करणे आणि प्रत्येक प्रोडक्टचा वापर योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घ्या १० मिनिटात मेकअप कसा करायचा.

चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा

मेकअप करण्यापूर्वी चेहरा फेस वॉशने धुवा. त्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा. दिवसा मेकअप करत असाल, तर मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन नक्की लावा.

प्रायमर आणि फाउंडेशन लावा

चेहऱ्यावर स्मूद बेस तयार करण्यासाठी थोडे प्रायमर लावा. त्यानंतर त्वचेच्या रंगाशी जुळणारे फाउंडेशन किंवा बीबी क्रीम वापरा. ब्यूटी ब्लेंडर किंवा मेकअप ब्रशच्या मदतीने ते व्यवस्थित ब्लेंड करा. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी कन्सीलरचा वापर करू शकता.

कॉम्पॅक्ट पावडरने बेस सेट करा

फाउंडेशन लावल्यानंतर चेहऱ्यावर हलकी कॉम्पॅक्ट पावडर लावा. यामुळे मेकअप सेट होण्यास आणि एक्स्ट्रा ऑइल कमी करण्यास मदत होते. विशेषतः कपाळ, नाक आणि हनुवटी या भागांवर पावडर लावा.

डोळ्यांना आकर्षक लुक द्या

डोळ्यांचा मेकअप करताना गोल्डन, ब्राऊन किंवा शॅम्पेन रंगाच्या आयशॅडोचा वापर करू शकता. दसऱ्याच्या पारंपरिक लुकसाठी गोल्डन रंग चांगला पर्याय ठरू शकतो. त्यानंतर डोळ्यांना बारीक आयलायनर लावा आणि पापण्यांवर मस्कारा लावा. आवडत असेल तर काजळही लावू शकता.

ब्लश आणि हायलाइटरने चेहऱ्याला द्या ग्लो

गालांवर हलक्या गुलाबी किंवा पीच रंगाचा ब्लश लावा. चेहऱ्याला नैसर्गिक रंग मिळण्यासाठी तो व्यवस्थित ब्लेंड करा. त्यानंतर गालांच्या वरच्या भागावर, नाकाच्या वरच्या भागावर आणि ब्रो बोन जवळ थोडे हायलाइटर लावा. यामुळे चेहऱ्याला हलकी चमक मिळेल आणि मेकअप अधिक आकर्षक दिसेल.

लिपस्टिकने मेकअप पूर्ण करा

पारंपरिक ड्रेससोबत लाल, मरून किंवा गुलाबी रंगाची लिपस्टिक छान दिसू शकते. लाइट मेकअप हवा असेल तर न्यूड पिंक किंवा पीच रंग निवडा. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना लिप बाम लावून मॉइश्चराइज करा. यामुळे ओठांना सुंदर रंग मिळेल आणि संपूर्ण लुक अधिक खुलून दिसेल.

सेटिंग स्प्रेने फायनल टच द्या

मेकअप अधिक वेळ टिकवण्यासाठी सेटिंग स्प्रेचा वापर करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर ड्रेसला मॅचिंग लहान किंवा मोठी टिकली सुद्धा लावू शकता.

Follow Us
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप