AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

November Travel : नोव्हेंबरमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा

Maharashtra Travel Destination: नोव्हेंबर महिना हा महाराष्ट्रात फिरण्यासाठी उत्तम मानला जातो. पावसाळ्यानंतर निसर्ग खुललेला असतो आणि हवामानही छान असतं. त्यामुळे या महिन्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रातील ही सुंदर ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा.

November Travel : नोव्हेंबरमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा
महाराष्ट्रातील ‘ही’ 5 ठिकाणं नक्की एक्सप्लोर कराImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 24, 2026 | 8:37 PM
Share

पावसाळा संपल्यानंतर महाराष्ट्रातील निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलतं. हिरव्यागार डोंगररांगा, धबधब्यांनी सजलेला परिसर, शांत समुद्रकिनारे आणि आल्हाददायक हवामान यामुळे नोव्हेंबरमध्ये फिरण्याची मजा काही औरच असते. अशा वातावरणात कुटुंबीय किंवा मित्रमंडळींसोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रात अनेक सुंदर पर्यटनस्थळं आहेत. या दिवाळीच्या सुट्टीत तुमची ट्रिप खास बनवण्यासाठी महाराष्ट्रातील ही आठ ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा.

लोणावळा

मुंबई आणि पुण्याजवळील लोणावळा वीकेंड ट्रिपसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. नोव्हेंबरमध्ये येथील डोंगररांगा, किल्ले, व्ह्यू पॉइंट्स आणि पवना तलावाच्या परिसरात फिरण्याचा आनंद घेता येतो. निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

महाबळेश्वर

थंडगार वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. वेण्णा तलाव, महाबळेश्वर मंदिर आणि विविध व्ह्यू पॉइंट्स ही येथील प्रमुख आकर्षणं आहेत. स्ट्रॉबेरी आणि स्थानिक खाद्य पदार्थांचाही येथे आस्वाद घेता येतो.

अलिबाग

बीचेसवर निवांत वेळ घालवायचा असेल, तर अलिबागला नक्की भेट द्या. येथील सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटकांना आकर्षित करतात. फॅमिलीसोबत किंवा मित्रमंडळींसह छोट्या सहलीसाठी अलिबाग चांगला पर्याय आहे.

नाशिक

वाईन यार्ड्स, खाद्य संस्कृती आणि शांत वातावरणासाठी नाशिक उत्तम पर्याय आहे. येथे वाईन यार्ड्सना भेट देण्यासोबतच स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वादही घेता येतो. धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी सुद्धा नाशिकमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत.

माथेरान

वाहनांच्या गोंगाटापासून दूर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी माथेरानला नक्की जा. येथील जंगलातील पायवाटा, सुंदर व्ह्यू पॉइंट्स आणि पायी फिरण्याचा अनुभव पर्यटकांना आकर्षित करतो. शांत आणि प्रदूषण मुक्त वातावरणात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण विशेष आहे.

भंडारदरा

सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आर्थर तलाव आणि हिरव्यागार परिसरासाठी भंडारदरा प्रसिद्ध आहे. शांत वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. फोटोग्राफी आणि निसर्ग भ्रमंतीची आवड असणाऱ्यांना येथील परिसर नक्कीच आवडेल.

ताडोबा

वन्यजीव आणि जंगल सफारीची आवड असणाऱ्यांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बेस्ट पर्याय आहे. येथे जंगल सफारी दरम्यान वाघांसह विविध वन्यजीव त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी मिळू शकते. जंगलातील जैवविविधता अनुभवण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

पाचगणी

डोंगर, विस्तीर्ण पठारं आणि सुंदर दृश्यांसाठी पाचगणी प्रसिद्ध आहे. टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि मॅप्रो गार्डन ही येथील प्रमुख आकर्षणं आहेत. आल्हाददायक वातावरणात फॅमिलीसोबत फिरण्यासाठी आणि सुंदर फोटो काढण्यासाठी पाचगणी उत्तम पर्याय आहे.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...