Mumbai local train Central Railway : चार तास उलटूनही मध्य रेल्वे विस्कळीतच, सेवा पूर्ववत होण्यास रात्र लागण्याची शक्यता

Mumbai local train Central Railway : काहींनी रुळावरुन उतरुन चालणं पसंत केलं. सकाळी 10 च्या सुमारास मुलुंड ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती.

Mumbai local train Central Railway : चार तास उलटूनही मध्य रेल्वे विस्कळीतच, सेवा पूर्ववत होण्यास रात्र लागण्याची शक्यता
Central Railway
| Updated on: Oct 26, 2026 | 3:05 PM

मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. सकाळी 10 च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. अजूनही लोकांचे हाल सुरु आहेत. आता दुपारचे अडीच वाजत आले आहेत. ऑफिसला येण्यासाठी म्हणून ज्यांनी सकाळी 10-11 च्या सुमारास ट्रेन पकडली. ते अजूनही ट्रेन मध्येच आहेत. ट्रेन एकाचठिकाणी बऱ्याचवेळ थांबल्या असून लोक तासनतास ट्रेनमध्ये ताटकळत थांबले आहेत. काहींनी रुळावरुन उतरुन चालणं पसंत केलं. सकाळी 10 च्या सुमारास मुलुंड ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर कांजूरमार्गला असलेल्या सिग्नल केबिनमध्ये आग लागली. परिणामी ठाणे ते विक्रोळी पर्यंत सिग्नल यंत्रणा बंद झाली.त्यामुळे वाहतूक पूर्णपणे कोलमडली.

अजून सुमारे तीन ते चार तासाचा वेळ केबल बदलण्यास लागणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होण्याची शक्यता आहे. सकाळी दहा वाजता सिग्नल केबिनमध्ये आग लागल्यानंतर कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या पुढचे सर्व सिग्नल एका झटक्यात बंद पडले. त्यामुळे मोटरमन्सला लोकल ट्रेन जागेवर थांबवाव्या लागल्या. मध्य रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड, रुळाला तडे जाणं यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडत असतात.

Loading...

लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत

काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात करण्यात आल्याची रेल्वे विभागाची माहिती आहे. लवकर वाहतूक सेवा सुरळीत करण्यात येईल असं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत.आता संध्याकाळी कार्यालय सुटण्याच्यावेळी रेल्वे स्टेशन्सवर अजून प्रचंड गर्दी होईल. काही लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे ट्रेन्समध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us