वीकेंड लंच करा स्पेशल; अशी बनवा चविष्ट मखाना मखनी भाजी!

या वीकेंडला नेहमीच्या भाजीऐवजी काहीतरी वेगळं खायची इच्छा आहे का? तर नक्की ट्राय करा मखाना मखनी भाजीची ही रेसिपी. ही खायला चविष्ट तर आहेच शिवाय बनवायलाही सोपी आहे. चला तर जाणून घ्या मखाना मखनी भाजीची रेसिपी.

वीकेंड लंच करा स्पेशल; अशी बनवा चविष्ट मखाना मखनी भाजी!
try makhana makhani curry recipe for weekend lunch
| Edited By: | Updated on: Sep 26, 2026 | 8:08 PM

वीकेंड आला की रोजच्या भाजी-पोळीपेक्षा काहीतरी वेगळं आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते. नेहमीच्या पनीर, मिक्स व्हेज, कोफ्ता असे प्रकार खाऊन कंटाळा आलाय आणि यावेळी लंचसाठी काहीतरी हटके ट्राय करायचं असेल, तर मखाना मखनी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मखाना सहसा स्नॅक्स म्हणून किंवा उपवासाच्या पदार्थांमध्ये खाल्ला जातो. मात्र त्यापासून तयार होणारी ही क्रीमी आणि मसालेदार भाजी लंचसाठीही छान लागते. विशेष म्हणजे मखान्याचा हलका क्रंच आणि मसालेदार ग्रेव्ही यामुळे या भाजीची चव आणखी वाढते. वीकेंडला कुटुंबासाठी काहीतरी स्पेशल बनवण्याचा विचार करत असाल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. रोटी, नान किंवा जीरा राइससोबत सुद्धा ही भाजी सर्व्ह करता येते. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या मखाना मखनी भाजीची ही खास रेसिपी.

मखाना मखनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

या रेसिपीसाठी ४०० ग्रॅम फर्म टोफू, ३० ग्रॅम भाजलेले मखाने आणि २०० ग्रॅम स्कायर किंवा हाय-प्रोटीन ग्रीक योगर्ट, १ चमचा तूप, १ तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, ३ लवंग, ५ काळी मिरी, २ काजू, १ मध्यम कांदा, ३ टोमॅटो, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, १ चमचा काश्मिरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी आवश्यक आहे.

अशी बनवा मखाना मखनी

सर्वप्रथम कढईत थोडे तूप गरम करून त्यात मखाने मंद आचेवर भाजून घ्या. भाजताना आच मंद ठेवा, जेणेकरून ते जळणार नाही आणि त्यांचा क्रंच टिकून राहिल. मखाने छान कुरकुरीत झाले की ते काढून बाजूला ठेवा. तसेच ग्रीक योगर्ट किंवा स्कायर चांगले फेटून वेगळे ठेवून द्या.

आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घाला. साधारण ३० सेकंद मसाले परतल्यानंतर त्यात काजू, चिरलेला कांदा, टोमॅटो, टोफू, मीठ आणि थोडे पाणी घाला. झाकण ठेवून १२ ते १५ मिनिटे शिजवा. सर्व साहित्य मऊ झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची स्मूद आणि क्रीमी पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट पुन्हा पॅनमध्ये घेऊन मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवा. दरम्यान छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे टाका. गॅस बंद करून त्यात काश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला टाका. ही फोडणी तयार ग्रेव्हीत घाला आणि चांगली मिक्स करा. त्यानंतर भाजलेले मखाने घालून आणखी २ ते ३ मिनिटे शिजवा.

गॅस मंद करून फेटलेले ग्रीक योगर्ट हळूहळू ग्रेव्हीत टाका. ते एकदम घालू नका. थोडे-थोडे करून मिसळल्यास ग्रेव्ही व्यवस्थित एकजीव होण्यास मदत होते. शेवटी ताजी कोथिंबीरने गार्निश करा. गरमागरम मखाना मखनी रोटी, नान किंवा जीरा राइससोबत सर्व्ह करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us