AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Homemade Facial : दसऱ्यापूर्वी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, घरच्या घरी फक्त ४ स्टेप्समध्ये करा हे फेशियल

Synopsis – Skin Care for Dasara: जर तुम्हाला दसऱ्याला ग्लोइंग स्किन हवी असेल तर त्यासाठी पार्लरला जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी सोप्या ४ स्टेप्समध्ये हे दोन फेशियल करू शकता.

Homemade Facial : दसऱ्यापूर्वी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, घरच्या घरी फक्त ४ स्टेप्समध्ये करा हे फेशियल
घरच्या घरी फक्त ४ स्टेप्समध्ये करा फेशियलImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 19, 2026 | 8:58 PM
Share

सणाच्या दिवशी आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी यासाठी बहुतांश महिला फेस क्लिनअप सोबतच फेशियल करतात. फेशियल त्वचेला डीप क्लीन करण्यास मदत करते. स्त्रिया सहसा पार्लरमध्ये फेशियल करण्यासाठी जातात. पण तुमच्या कडे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल किंवा तुम्हाला महागडे फेशियल करायचे नसेल तर काळजी करू नका. तुम्ही घरच्या घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने फेशियल करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याची गरज नाही. अगदी ४ स्टेप्स फॉलो करून तुम्ही फेशियल करून चेहऱ्यावर ग्लो मिळवू शकता. आम्ही तुम्हाला दोन फेशियलबद्दल सांगत आहोत जे तुम्ही ४ स्टेप्समध्ये पूर्ण करू शकता. चला तर मग जाणून घ्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लोसाठी कोणते फेशियल करू शकतो.

एलोवेरा फेशियल

पहिल्या स्टेपमध्ये चेहरा स्वच्छ करा. यासाठी एका वाटीत एलोवेरा जेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा. काही वेळ मसाज करा आणि नंतर कापसाने चेहरा स्वच्छ करा. आता एलोवेरा जेल, लिंबाचा रस आणि तांदळाचे पीठ मिक्स करून स्क्रब तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून साधारण २ मिनिटं सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

नंतर मसाजसाठी एका वाटीत १ टीस्पून एलोवेरा जेल, १ टीस्पून मध घ्या आणि मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि नंतर १० मिनिटे मसाज करा. फेशियलची शेवटची स्टेप म्हणजे फेस पॅक. हे बनवण्यासाठी चंदन पावडर, एलोवेरा जेल आणि गुलाब पाणी मिक्स करा. तयार केलेले फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

पपई फेशियल

क्लींजिंगसाठी मॅश केलेली पपई आणि दूध घेऊन चांगले मिक्स करा. तुमच्या बोटांनी हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि १-२ मिनिटे नीट मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आता मॅश केलेली पपई आणि तांदळाचे पीठ मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावून मसाज करा. कमीत कमी ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा.

आता मॅश केलेल्या पपईची पेस्ट आणि एलोवेरा जेल मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावून मसाज करा. कमीत कमी १० मिनिटे हलका दाब देऊन वरच्या दिशेने मसाज करा. आता पॅक बनवण्यासाठी एका वाटीत मॅश केलेली पपई घ्या. त्यात मध आणि लिंबाचा रस घाला आणि चांगले मिक्स करा. संपूर्ण चेहरा आणि मानेवर समान रीतीने लावा. पॅक १०-१५ मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष