AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय, जे अवलंबायलाही सोपे

लहान मुलं व्यवस्थितपणे घरातील जेवण जेवत नाहीत त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या उंची आणि वजनावर होतो. बहुतेक पालकांना आपल्या मुलाच्या भूक न लागण्याची चिंता वाटते. तर ही चिंता कमी करण्यासाठी आजच्या लेखात आपण मुलाची भूक वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या आयुर्वेदिक उपायांबद्दल जाणून घेऊयात.

लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी करा 'हे' आयुर्वेदिक उपाय, जे अवलंबायलाही सोपे
foodImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 26, 2026 | 12:50 PM
Share

आजकाल बहुतेक पालकांना चिंता वाटते की त्यांची मुलं पुरेसं अन्नाचे सेवन करत नाही किंवा‍ त्यांना भूक लागत नाही. तर याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात मिळणारे चिप्स आणि इतर पॅकेज केलेले पदार्थ खाण्याचे सततचे सेवन. अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, अशा पदार्थांमध्ये असलेल्या प्रिझर्व्हेटिव्हमुळे मुलांना हे पदार्थ खावेसे वाटतात. अशा परिस्थितीत मुलांना शरीरात भूक न लागण्याची व घरातील जेवण न खाण्याची समस्या देखील निर्माण होऊ लागते. अशातच आपल्या मुलांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालावे याकरिता प्रत्येक पालकांची खूप धावपळ होते. तर काही घरांमध्ये काही मुलं अशी असतात जे अन्नाचा एकही कण खात नाही. कारण अशी अनेक मुलं आहेत जी 3 वर्षे फक्त दूधच पितात. याकरिता मुलांनी घरातील पौष्टिक आहार घ्यावा यासाठी पालक वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात.

मुलांमध्ये हे वर्तन सामान्य आहे, परंतु ही समस्या अशीच राहिल्यास अनेकदा वजन कमी राहते. आजकाल लोक मुलांना मल्टीव्हिटॅमिन सिरप देतात, पण पोषक तत्वांचा सर्वोत्तम स्रोत अन्न आहे. तर या लेखात आपण मुलाची भूक वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत ते जाणून घेऊयात.

मुलांची भूक वाढवण्याबद्दल आयुर्वेद काय सांगते?

भूक वाढवण्यासाठी पचनसंस्थेची नैसर्गिकरित्या काळजी घेण्याचा सल्ला आयुर्वेद देत असते. आयुर्वेदिक औषधी वनस्पती, घरगुती उपाय आणि पारंपरिक औषधे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांची भूक वाढवू शकतात. या आयुर्वेदिक पद्धती पचनक्रिया सुधारतात आणि नैसर्गिकरित्या आपली भूक वाढवण्याचे काम करतात.

आयुर्वेदिक उपाय

बडीशेपचे पाणी – ही छोटीशी बडीशेप पोटासाठी एक वरदान आहे. बडीशेपही पचनसंस्थेसाठी उत्कृष्ट मानली जाते. तिच्या थंडावा देणाऱ्या गुणधर्मामुळे उन्हाळ्यात तिचे सेवन करणे सर्वोत्तम ठरते. लहान मुले ती थेट खाऊ शकत नाहीत, म्हणून त्यांना बडीशेपचे पाणी प्यायला द्यावे. दररोज दोन चमचे बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोट फुगणे आणि पचनाच्या इतर समस्या टाळण्यास मदत होते. निरोगी पोटामुळे भूकही वाढते.

आल्याचा उपाय – आयुर्वेद तज्ञांच्या मते भूक वाढवण्यासाठी आलं आणि सैंधव मीठाचा उपाय देखील प्रभावी आहे. आपल्या मुलाला जेवण देण्याआधी सैंधव मीठासोबत आल्याचा एक तुकडा त्याच्या तोंडात ठेवा. तो तुकडा थोडा वेळ तोंडात ठेवा आणि नंतर काढून टाका. यामुळे लाळ निर्माण होईल, जी पोटातील एन्झाइम्सना सक्रिय करेल.

लवंग आणि मध – तज्ज्ञांच्या मते भूक वाढवण्यासाठी लवंग आणि मधाचा उपाय प्राचीन काळापासून वापरला जात आहे. लवंगामध्ये असे अनेक घटक असतात जे पोटाचे आरोग्य सुधारतात. सर्वप्रथम, लवंगा भाजून त्याची पूड बनवा. या पूडचा थोडासा भाग अर्धा चमचा मधात मिसळून आपल्या मुलाला खाऊ घाला. यामुळे केवळ पोटाचे आरोग्यच सुधारणार नाही, तर सर्दी आणि खोकला टाळण्यासही मदत होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट