Hair Care : काळजी घेऊनही केस दिसत असतील निस्तेज तर ‘हे’ हेअर मास्क ट्राय करा

मानसी मांडे,  Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 10:13 AM

केसांमधून केमिकल्स काढण्यासाठी जास्त काळजी घेणे गरजेचे असते. हेअर मास्क लावून केसांचे डिटॉक्स कसे करावे हे जाणून घेऊया.

Hair Care : काळजी घेऊनही केस दिसत असतील निस्तेज तर 'हे' हेअर मास्क ट्राय करा
Image Credit source: Freepik

नवी दिल्ली – आपले केस सुंदर आणि स्टायलिश (beautiful and stylish hair) रहावे यासाठी अनेक महिला बाजारातील वेगवेगळी उत्पदने वापरक असतात. पण त्यामध्ये असलेली केमिकल्स (chemicals in hair) केसांमध्ये साठून राहतात व त्यामुळे केस कोरडे व निर्जीव दिसू लागतात. केसांचा रंग कमी होतो आणि स्काल्पलाही खाज (itching in scalp) सुटू लागते. लोकांना असं वाटतं की शांपूचा वापर केल्याने केसांमधील केमिकल्स निघून जातात, पण ते खरं नाहीये. केसांमधुन हा हट्टी पदार्थ काढून टाकण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. येथे आपण केस डिटॉक्स करण्याबद्दल बोलत आहोत. हेअर मास्क (hair mask) लावून केसांचे डिटॉक्स कसे करावे हे जाणून घेऊया.

दही व लिंबाचा मास्क

कोंडा हे देखील केस निस्तेज होण्याचे कारण आहे आणि तो काढणे सोपे नाही. दही आणि लिंबाच्या हेअर मास्कच्या मदतीने तुम्ही काही दिवसात कोंडा दूर करू शकता. त्यासाठी एका भांड्यात दही घ्यावे आणि त्यात दोन चमचे लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून बोटांच्या सहाय्याने आपल्या स्काल्पला लावा आणि केसांनाही चोळा. थोड्या वेळानंतर सौम्य शांपू आणि कंडीनशनर लावून केस धुवून टाकावेत.

मुलतानी मातीच्या सहाय्याने केसांची काळजी

मुलतानी मातीच्या सहाय्याने चेहऱ्यासोबतच केसांचीही काळजी घेता येते. मुलतानी मातीमध्ये असे गुणधर्म आढळतात जे केसांमधली रसायने सहजपणे काढून टाकतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे डिटॉक्स करतात. मुलतानी माती स्काल्प स्वच्छ करते आणि डोके थंड ठेवते. मुलतानी माती भिजवताना त्यात ॲपल सायडर व्हिनेगरही घालावे. हे मिश्रण एक रात्र भिजवून ठेवल्यानंतर, केसांना लावावे आणि अर्ध्या तासानंतर, कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.

कोको पावडरचा हेअर मास्क

हे सुद्धा वाचा

लांब आणि जाडजूड केस हवे असतील तर कोको पावडर हेअर मास्क ट्राय करा. कोको पावडरही स्काल्प स्वच्छ करण्यासाठीदेखील प्रभावी मानली जाते. केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी तुम्ही त्यात दूध वापरू शकता. एका भांड्यात थोडी कोको पावडर घ्या आणि त्यात 5 ते 6 चमचे दूध घाला. ब्रशच्या मदतीने हा डिटॉक्स मास्क स्काल्पवर लावा आणि वाळू द्या. थोड्या वेळाने सौम्य शांपूने केस धुवा आणि नतर आठवणीने कंडीशनर लावा.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI