AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair | उन्हाळ्यात अधिक केस खराब होत आहेत? मग हे हेअर मास्क नक्की वापरा!

उन्हाळ्यात टाळूला खाज सुटते. त्यामुळे केस गळणे या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही केळी आणि मधापासून बनवलेला हेअर मास्कही वापरून पाहू शकता. केळ्यामध्ये पोटॅशियम असते. त्यामुळे मुळे मजबूत होतात. ब्लेंडरमध्ये एक केळी आणि 3 चमचे मध मिसळा, हा मास्क 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवा, त्यानंतर केस धुवा

Hair | उन्हाळ्यात अधिक केस खराब होत आहेत? मग हे हेअर मास्क नक्की वापरा!
जाणून घ्या, केस धुण्याचा योग्य मार्ग कोणता
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 10:26 AM
Share

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये केस आणि त्वचेची पार वाट लागते. जर आपण योग्य वेळी केसांची आणि त्वचेची काळजी घेतली नाही तर आपली त्वचा कोरडी होण्यास आणि केस (Hair) गळण्यास सुरूवात होते. या हंगामामध्ये टाळूला खाज सुटण्याची समस्या उद्भवते. केस गळणे आणि तुटणे सुरू होते. केस स्वच्छ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी प्रत्येक आपण काही घरगुती उपायही करू शकतो. ज्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते. तुम्ही घरच्या-घरी नैसर्गिक घटकांचा वापर करून हेअर मास्क (Hair mask) बनवू शकता. ते केसांना खोल पोषण देण्यासाठी आणि केसांना मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. तुम्ही केसांसाठी हेअर मास्क कसा बनवू शकता, हे आपण जाणून घेऊयात.

केळी आणि मध

उन्हाळ्यात टाळूला खाज सुटते. त्यामुळे केस गळणे या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही केळी आणि मधापासून बनवलेला हेअर मास्कही वापरून पाहू शकता. केळ्यामध्ये पोटॅशियम असते. त्यामुळे मुळे मजबूत होतात. ब्लेंडरमध्ये एक केळी आणि 3 चमचे मध मिसळा, हा मास्क 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवा, त्यानंतर केस धुवा. हे हेअर मास्क टाळूला निरोगी आणि मुलायम बनविण्यास मदत करतात.

अंडे आणि ऑलिव्ह ऑइल

अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. त्यात इतरही अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे खराब झालेल्या केसांची समस्या दूर होते. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्यात दोन अंड्यांचा पांढरा भाग मिसळा. हे चांगले मिक्स करून घ्या. 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस शाम्पूने धुवा, हा हेअर मास्क तुम्हाला कोरड्या केसांची समस्या दूर करण्यास मदत करतो.

अॅव्होकॅडो आणि बदामाचे तेल

आपल्या केसांसाठी अॅव्होकॅडो खूप जास्त फायदेशीर आहे. याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता. हे केसांना चमकदार बनवते. हा हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम अॅव्होकॅडो सोलून मॅश करा आणि मॅश केलेल्या अॅव्होकॅडोमध्ये एक चमचा बदामाचे तेल घाला. ही पेस्ट केसांना लावा, हेअर मास्क लावल्यानंतर शॉवर कॅप घाला. 30 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.