AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : स्वयंपाक घरातील या वस्तू जर वारंवार हातातून पडत असतील तर दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, काय आहेत संकेत?

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपल्या सोबत एखादी चांगली किंवा वाईट घटना घडायची असल्यास त्यापूर्वी त्याचे संकेत मिळत असतात. हे संकेत लक्षात घेणं गरजेचं असतं. अशाच काही संकेतांबाबत वास्तुशास्त्रात नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Vastu Shastra : स्वयंपाक घरातील या वस्तू जर वारंवार हातातून पडत असतील तर  दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, काय आहेत संकेत?
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 9:42 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे. ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाही. तर इतरही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. घरात वास्तुदोष कोण कोणत्या कारणांमुळे निर्माण होऊ शकतो? याबद्दल देखील वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर हा तुमच्या घरातील ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. कारण स्वयंपाक घरात तुम्ही जेवण तयार करतात, आणि या जेवणातून तुम्हाला ऊर्जा मिळते. जे लोक अन्नाचा सन्मान करतात, त्यांच्यावर सदैव अन्नपूर्णा मातेचा कृपा आशीर्वाद असतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये असं देखील म्हटलं आहे की, जर तुमच्यासोबत काही विशिष्ट घटना घडायची असेल मग ती शुभ घटना असो अथवा अशुभ त्याचे काही संकेत तुम्हाला मिळत असतात. आज आपण स्वयंपाक घराशी संबंधी अशाच काही संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. जर स्वयंपाक घरातील विशिष्ट वस्तू वारंवार तुमच्या हातातून पडत असतील तर हे अशुभ मानलं जातं. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

तांदूळ – जर एखाद्या घरात वारंवार तांदूळ जमिनीवर सांडत असतील तर हा एक अत्यंत अशुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ लवकरच तुमच्या घरात मोठी भांडणं होण्याची शक्यता आहे असं मानलं जातं. तसेच यामुळे घरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीने अन्न खाली पडणं हा अन्नपूर्णा मातेचा देखील अपमान समजला जातो.

दूध – दुधाला चंद्र ग्रहाचं प्रतिक मानलं जातं, जर तुमच्या घरात वारंवार दूध सांडत असेल किंवा उतू जात असेल, तर याचा अर्थ असा की तुमचा चंद्र ग्रह कमजोर आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे चंद्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

तेल – तेलाचा संबंध हा शनि देवाशी जोडला जातो. त्यामुळे जर तुमच्या हातातून वारंवार तेल सांडत असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुमच्या घरात शनीदोष निर्माण झाला आहे. ज्या घरात शनीदोष निर्माण होतो, त्या घरावर अनेक संकटं येऊ शकतात. त्यामुळे घरावरील संकटं दूर व्हावेत आणि शनी देवांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी तुम्ही दर शनिवारी शनी देवांना तेल अर्पण करू शकतात. यामुळे शनी देव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला इच्छित फळ मिळते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...