शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' जाहीर केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून, योजना पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून, योजना पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण माहिती महाआयटी (MahaIT) पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील सर्व कर्जखात्यांचे लेखापरीक्षण सहकार विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.
यासोबतच अपात्र लाभार्थ्यांची माहितीही पोर्टलवर नोंदविण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. लवकरच या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, कृषी क्षेत्राला आर्थिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 27, 2026 04:48 PM
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं

