MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी याप्रकरणी MPSC आयोगाकडे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले की, अनेकांना प्रश्न पडला असेल की या प्रकरणी तुकाराम मुंडे यांच्यासोबत चर्चा का? त्यांना सांगू इच्छितो आम्ही संबंधित पत्र मुंडे साहेबांना दिले होते. त्याच वेळी त्यांच्या कार्यालयातूनही पुढील कार्यवाहीसाठी पत्र पाठवण्यात आले. आम्ही दिलेल्या निवेदनावर योग्य कारवाई होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी ऋषिकेश दांगड याचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, पत्र समोर आल्यानंतर ऋषिकेश दांगड यांनी मुंडे साहेबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यात आल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला त्यांनी तक्रार केली, मात्र नंतर आपण चेष्टा करत होतो, असे सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी दावा केला की, संबंधित क्लासमधील 100 पैकी 90 प्रश्न परीक्षेत जुळले. यामागे कोणाकडून तरी 100 टक्के दबाव असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच पेपर शेअर करणारा उमेदवार आणि संबंधित क्लासचालक दोघेही नंदुरबारचे असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
Published on: Jul 27, 2026 04:33 PM
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक