Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात केंद्राच्या राजकारणात प्रवेश केल्यास एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. भरत गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आपण देवाकडेही साकडं घातलं आहे.
शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात केंद्राच्या राजकारणात प्रवेश केल्यास एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. भरत गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आपण देवाकडेही साकडं घातलं आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, धरण सध्या 95 टक्के भरलं आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 114.53 टीएमसी इतका असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 50.87 टीएमसी असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे दौंड परिसरातून सध्या 69,492 क्युसेक वेगाने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. वाढत्या आवक लक्षात घेऊन धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने आजपासून भीमा नदीत 6,600 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावं तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Published on: Jul 27, 2026 04:12 PM
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video

