ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळाली आहे. 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या पारंपरिक मेळाव्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जुलै महिन्यातच अर्ज केला होता. मुंबई महानगरपालिकेकडून अखेर ही परवानगी मिळाल्याने, शिवसैनिकांमध्ये उत्साह असून मेळाव्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्याची परवानगी मिळाली आहे. 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी हा पारंपरिक मेळावा आयोजित केला जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जुलै महिन्यातच या परवानगीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर महानगरपालिकेकडून मेळाव्यासाठी हिरवा कंदील मिळाला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जी साऊथ वॉर्ड कार्यालयाकडून लवकरच परवानगीचे अधिकृत पत्र ठाकरेंच्या शिवसेनेला सुपूर्द केले जाईल. या पत्रामध्ये मेळाव्यासाठीच्या नियम व अटींचा उल्लेख असेल. शिवसेनेत फूट पडल्यापासून, दसरा मेळाव्याच्या स्थळावरून दोन्ही गटांमध्ये वारंवार संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवानंतर शिवसैनिकांना दसरा मेळाव्याची विशेष आतुरता असते, अशा परिस्थितीत परवानगी मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
Published on: Sep 13, 2026 11:51 AM
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास

