Face Wash : ऑइली स्किन, एक्नेमुळे त्रस्त? कडुलिंबाच्या सालीपासून बनवा हा खास फेस वॉश
Face Wash : ऑइली स्किनमुळे पिंपल्स, एक्नेची समस्या वारंवार होत असते. अनेक वेळा चेहरा धुतल्यानंतरही चेहरा फ्रेश दिसत नाही. तुम्ही सुद्धा एक्नेच्या समस्येने त्रस्त असाल तर हा फेस वॉश तुमची मदत करू शकतो. कडुलिंबाच्या सालीपासून फेस वॉश कसा बनवायचा हे जाणून घ्या.

ड्राय आणि कॉम्बिनेशन स्किन प्रकारापेक्षा ऑइली स्किन असलेल्या लोकांच्या समस्या वेगळी असते. चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स, एक्ने येतात. कधी कधी चेहऱ्यावर याचे डागही पडतात. ऑइली स्किन असलेल्या व्यक्तींनी चेहरा कितीही वेळा धुतला तरी सुद्धा फ्रेश दिसत नाही. तसेच घाम, तेल यामुळे चेहरा डल दिसू लागतो.
यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. ऑइली त्वचा, एक्ने, पिंपल्स, यामुळे तुम्ही सुद्धा त्रस्त असाल तर हा फेस वॉश तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही कडुलिंबाच्या सालीपासून बनलेल्या फेस वॉशने चेहरा धुतला तर तुम्हाला फ्रेश लूक मिळू शकतो. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा कडुलिंबाच्या सालीपासून फेस वॉश.
असा बनवा क़डुलिंबाच्या सालीपासून फेस वॉश
जेव्हा आपण वारंवार फेस वॉशने चेहरा धुतो तेव्हा चेहऱ्यातील नैसर्गिक तेल निघून जातो. पण खरं तर समस्या कायम राहते आणि पुन्हा तेल तयार होऊ लागते. त्यामुळे तेल निर्मिती कमी करणारे आणि त्वचेला चमकदार बनवणारी पद्धत वापरली पाहिजे. यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या सालापासून फेस वॉश बनवा.
हे फेस वॉश बनवण्यासाठी कडुलिंबाची साल, गुलाब जल आणि ग्रीन टी आवश्यक आहे. तुम्हाला जवळपासच्या कोणत्याही कडुलिंबाच्या झाडाची साल सहज मिळू शकते. कडुलिंबाच्या सालीचा एक छोटा तुकडा भिजवा. आता ही साल खलबत्त्यात वाटून घ्या. नंतर ग्रीन टी सुद्धा वाटून घ्या. आता हे गुलाब जलमध्ये मिक्स करून याची पेस्ट तयार करा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कडुलिंबाची साल आणि ग्रीन टी एकत्र वाटून त्याची पूड करून ठेवू शकता. प्रभावी परिणामांसाठी कडुलिंबाची साल नैसर्गिक स्वरुपात वापरा. बाजारात मिळणारी कडुलिंबाची पावडर कमी प्रभावी ठरू शकते. त्यामुळे कडुलिंबाच्या झाडाची साल वाटून त्याची पेस्ट बनवा. आता ही तयार केलेली पेस्टा चेहऱ्यावर लावा. साधारण १० मिनिटे राहू द्या आणि नंतर चेहरा पाण्याचे धुवा.
मुलतानी मातीत करा मिक्स
जर तुम्हाला एक्ने आणि तेलकटपणाचा त्रास होत असेल आणि तुमचा चेहरा निस्तेज दिसत असेल, तर मुलतानी माती तुमच्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकते. फेस वॉशसाठी तयार केलेली पेस्ट मुलतानी मातीमध्ये मिक्स करून फेस पॅक तयार करा. तो तुमच्या चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाईल आणि अतिरिक्त तेल निर्मितीला प्रतिबंध होईल, ज्यामुळे मुरुमे कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्याची चमक टिकून राहील. फेस पॅक लावल्यानंतर त्यावर बर्फ चोळावा. यामुळे त्वचेतील रक्तसंचार वाढतो आणि पिंपल्स, एक्नेसारख्या समस्या कमी होतात.
