ॲसिडिटीची औषधं घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता औषधं मिळणार नाहीत; गोळी घेण्यासाठी ठेवली एकच अट!
अॅसिडिटीचा त्रास झाला की अनेकजण स्वतःहून मेडिकलमधून औषध घेतात. मात्र वोनोप्राझान 10 आणि 20 mg च्या विक्रीसाठी आता Registered Medical Practitionerच्या प्रिस्क्रिप्शनची अट ठेवण्यात आली आहे.

अॅसिडिटीचा त्रास झाला की अनेकजण डॉक्टरांकडे न जाता स्वत:च डॉक्टर बनून उपचार आणि नुस्के सांगायला तयार होतात. आता अश्या प्रकारचे औषध घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अॅसिडिटीच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वोनोप्राझान’ या औषधाच्या विक्रिबाबत आता नवीन नियम समोर आला आहे. CDSCO ने हे औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू नये. अशी अट आता ठेवली आहे.
वोनोप्राझान हे औषध अॅसिडिटी आणि पोट दुखी संबंधित काही आजारांच्या उपचारासाठी उपचारासाठी वापरले जाते. या औषधाचे १० आणि २० मिलिग्रॅमचे डोस भारतात मंजूर आहेत. मात्र आता त्याची विक्री डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येणार आहे. विशेषत: पोट आणि आतड्यांशी संबंधित आजारांसाठी हे औषध वापरताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
वारंवार अॅसिडिटी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून सतत कोणतेही औषध घेणे योग्य नाही. एखादी व्यक्ती जर दीर्घकाळ अॅसिडिटीची औषध घेत असेल त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन B12 आणि मॅग्नेशियमच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.तर काही लोकांना इतर त्रासही जाणवू शकतो.
दरम्यान,अॅसिडिटीच्या औषधासोबतच काही इतर आजारांवरील औषधांबाबतही नवीन चाचण्या आणि बदलांची माहीती समोर आली आहे. फॅटी लिव्हरच्या उपचारासाठी एफ्रुव्सिफर्मिन आणि रेसमेटिरोम या औषधांवर पुढील टप्प्यातील चाचण्या करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.या चाचण्यामधून औषध किती सुरक्षित आणि परिणामकारक आहेत हे तपासले जाणार आहे.
तसेच दीर्घकाळ बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि इतर पचनाच्या समस्या असलेल्या रूग्णांसाठी लिनाक्लोटाईडस या औषधाबाबतही चाचण्या करण्यात येणार आहेत. म्हणून अॅसिडिटी झाली म्हणून स्वत:च्या मनानो औषध घेण्याऐवजी, त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. विशेषत: वोनोप्राझान औषध घेण्यासाठी आता डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे.