Video-Jalneti | कोरोना विषाणूला फ्लशआउट करायचंय, जाणून घ्या काय सांगते जलनेती

कोविड काळात आयुर्वेदाचं महत्त्व आणखीचं वाढलं. जलनेती नाक स्वच्छ करण्याची एक प्रक्रिया. या प्रक्रियेत नाकपुड्या स्वच्छ केल्या जातात. यातून कोरोना व्हायरससारखा विषाणू फ्लशआउट होऊ शकतो किंवा त्यांची तीव्रता तरी कमी करता येते.

Video-Jalneti | कोरोना विषाणूला फ्लशआउट करायचंय, जाणून घ्या काय सांगते जलनेती
जलनेती करताना डॉ. केतकी पाटील.
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 3:26 PM

कोविडच्या परिस्थितीत योगा आणि प्राणायमचे महत्त्व आपण जाणतो. कोरोनाच्या परिणामांपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. असा एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो म्हणजे जलनेती. जलनेती ही एक अशी क्रिया आहे जी आपल्या नाकपुड्यांना स्वच्छ करते. याचे काय फायदे आहेत. याचा परिणाम काय होतो आणि काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती जाणून घेऊया. काय सांगतात नागपुरातील डॉ. केतकी पाटील.

पॉट, पाणी आणि टॉवेलची गरज

जलनेती करण्यासाठी तीन वस्तूंची आवश्यकता आहे. जलनेती पॉट, कोमट पाणी आणि टॉवेल. अडीचशे ते तीनशे मिलीलीटर पाणी घ्यावे लागते. या कोमट पाण्यात दोन चिमूट मिठ टाकावा लागतो. पाणी खूप गरम किंवा थंड नसावा. नेती केल्यानंतर चेहरा पुसण्यासाठी या टॉवेल किंवा नॅपकीनची गरज पडते. जलनेती सकाळी किंवा संध्याकाळी उपाशापोटी करावी. शक्यतो जेवण केल्यानंतर जलनेती करू नये.

जलनेतीची प्रक्रिया

जलनेती बसून किंवा उभे राहून करता येते. उच्च रक्तदाब किंवा गुडग्यात त्रास असणाऱ्यांनी उभे राहूनच जलनेती करावी. पहिल्यांदा जलनेती केल्यास श्वास घेण्यास थोडासा त्रास होतो. अशावेळी तोंडाने श्वास घ्यावे. पाण्यात बुडल्यानंतर जसं वाटतं तसंच जलनेती करताना वाटतं. पण, जलनेती करताना तोंड खुला असतो.

जलनेतीची कृती

सर्वात पहिल्यांदा दोन पायात एक ते दीड फूट अंतर ठेवून उभे राहावे. त्यानंतर डोकं थोडसं झुकवून नेती करावी. जलनेती करताना तोंडानं हळूहळू श्वास घ्यावा. एका नाकपुडीतून पाणी टाकून ते दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढायचे असते. सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो. पण, सरावातून हे सहज शक्य होते. नेती झाल्यानंतर आपला चेहरा व्यवस्थित पुसून घ्यावा. नाक साफ करावा. शिवाय कपालभारती केल्यानं नाक पूर्णपणे साफ होते.

जलनेतीचे फायदे

कोरोना व्हायरस नाक किंवा तोंडावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतो. नाकातून पुढे जाऊन तो फुफ्फुसात प्रवेश करू शकतो. परंतु, आपण जलनेती केली, तर हा विषाणू बाहेर पडू शकतो किंवा याचा संसर्ग कमी होऊ शकतो. अलर्जी, खोकला, दमा असेल, तर जलनेती केल्यास याचा फायदा होता. गळ्याच्या संसर्गातही जलनेती फायदेशीर आहे. डोकेदुखीची समस्या असल्यास कफ साफ होऊन हलके वाटते. जलनेती केल्यानं प्राणायमाची सिद्धी होण्यास मदत होते, असं डॉ. केतकी पाटील यांनी सांगितलं.

child’s height | भविष्यात किती वाढेल तुमच्या मुलाची उंची? या फार्म्यूल्याने करू शकता माहिती

Video- Nagpur food | थर्टी फर्स्टसाठी मटणासोबत लांब रोट्यांची लज्जत न्यारी; महिलांची सकाळपासून तयारी!

Healthy Breakfast: नाश्त्यात काय खाणार, ओट्स की फ्लेक्स; माहिती करून घ्या काय आहे हेल्दी?