AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाल्कनीत लावा ही 5 सुंदर फुलं, बिया ऑनलाईन स्वस्तात उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुमच्या घरातील बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये ही 5 प्रकारची रंगीबेरंगी सुंदर फुल लावून करा. तर फुलांचे उच्च दर्जाचे बियाणे तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत ऑनलाइन उपलब्ध आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात...

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाल्कनीत लावा ही 5 सुंदर फुलं, बिया ऑनलाईन स्वस्तात उपलब्ध
Beautiful Flowers
| Edited By: | Updated on: Jan 02, 2026 | 10:35 AM
Share

नवीन वर्ष हे नवीन आशा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. येणाऱ्या नवीन वर्षात बरेच लोकं नवीन सवयी आणि त्यांच्या जीवनात बदल स्वीकारतात. अशातच तुम्हाला जर 2026 च्या सुरुवातीला तुमचे घर सकारात्मक उर्जेने आणि ताजेपणाने भरायचे असेल, तर तुमच्या घरातील बागेत ही सुंदर फुलांची लागवड करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. रंगीबेरंगी, सुगंधित आणि आकर्षक फुले तुमच्या घराला केवळ शोभा देत नाहीत तर कल्याण आणि शांतीची भावना देखील देतात. ते तुमच्या घरात नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. तुम्ही नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSC) ऑनलाइन स्टोअरमधून परवडणाऱ्या किमतीत या सुंदर फुलांचे सर्वोत्तम दर्जाचे बियाणे ऑर्डर करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कोणती फुलं लावावीत…

झेंडूचं फुलं

तुम्हाला जर तुमच्या घराला सुंदर लूक द्यायचा असेल, तर झेंडू हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही तुमच्या बागेत ही फुले लावू शकता. माय स्टोअरनुसार Pusa Parv जातीचा झेंडूचे फुल त्याच्या गडद लाल, मध्यम आकाराच्या फुलांसाठी ओळखला जाते, जो अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. या जातीच्या फुलांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मुबलक प्रमाणात फुलं देतात जी तुमची बाग दीर्घकाळ फुललेली आणि आकर्षक ठेवू शकतात.

ट्विंकल ड्वार्फ (तारेच्या आकारासारखी फुलं)

तुम्ही जर वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या बागेत सुंदर फुल फुलवायची असतील तर ट्विंकल ड्वार्फ या जातीची फुलं तारेच्या आकाराचे, झालरदार पाकळ्या, बहुतेकदा द्वि-रंगीत मिश्र छटा असलेल्या रंगात फुलतात. ही फुल तुमच्या बाल्कनीत लावण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. ही अनोखी जातीचं फुल माय स्टोअरमध्ये NSC Phlox Cuspidata Twinkle Dwarf Mixed Flower Seed म्हणून उपलब्ध आहे . त्यांचा कॉम्पॅक्ट आकार आणि जोमदार वाढ ही फुले बागांमध्ये, कुंड्यांमध्ये दीर्घकाळ टिकणारी भर घालते.

या जातीची खासियत म्हणजे ही फुलं कमी देखभालीतही खूप फुलतात. तुम्ही ऑनलाईन द्वारे फक्त 48 रूपयांमध्ये त्याचे बियाणे मागवू शकता.

सुंदर पांढरी फुले

तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला सुंदर पांढरी फुले लावू शकता. यासाठी NSC क्रायसॅन्थेमम पालुडोसम पांढऱ्या फुलांच्या बिया निवडा . या फुलांच्या पांढऱ्या पाकळ्या आणि चमकदार पिवळ्या रंगाचा मध्यभाग तुमच्या बागेत एक विशेष आकर्षण निर्माण करू शकतो. सूर्यप्रकाश पडताच ही सुंदर फुले फुलतात, यासाठी या फुलांना तुमच्या बाल्कनीत जिथे सुर्यप्रकाश येतो त्या ठिकाणी ठेवा. ही फुलं घरातील कुंड्या, टेरेस गार्डन, बाल्कनी इत्यादी ठिकाणी सहजपणे वाढवू शकता.

साल्विया हॉर्मिनम ‘ब्लू मंडे’

ही सुंदर फुले गार्डन छान मनमोहक दिसण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. साल्विया हॉर्मिनम “ब्लू मंडे” ही विविधता त्याच्या आकर्षक देखाव्यासाठी ओळखली जाते. तुम्ही फक्त 30 रूपयांमध्ये 3 ग्रॅम बियाणे ऑर्डर करू शकता. ही फुले खूप आकर्षक आहेत. तुम्ही ती घरामध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी लावू शकता.

लाल, गुलाबी आणि पांढरी फुले

NSC चे बेलिस मॉन्स्ट्रोसा डबल रोझ फ्लॉवर लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगात फुलते. या फुलांना वाढण्यासाठी फारशी काळजी घ्यावी लागत नाही. तुम्ही या फुलाचा 3 ग्रॅम बियाण्याचा पॅक फक्त 130 मध्ये ऑनलाइन ऑर्डर करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.