Heart Attack Symptoms: महिलांनो चक्कर, मळमळ, अंग थंड पडलंय…हार्ट अटॅकच्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!, अन्यथा…

हार्ट अटॅकमध्ये छातीत दुखणे किंवा दबाव जाणवणे हे सामान्य लक्षण आहे. मात्र महिलांमध्ये श्वास घेण्यास त्रास, मळमळ, चक्कर, थंड घाम आणि पाठ किंवा जबड्यातील अस्वस्थता यांसारखी लक्षणंही दिसू शकतात.

Heart Attack Symptoms: महिलांनो चक्कर, मळमळ, अंग थंड पडलंय...हार्ट अटॅकच्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!, अन्यथा...
HEART HEALTH
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 9:56 PM

हार्ट अटॅक म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येत ते चित्र म्हणजे छातीत होणाऱ्या तीव्र वेदना.मात्र प्रत्येक वेळी हॉर्ट अॅटकची लक्षणं अगदी स्पष्ट असतीलच असं नाही.त्याशिवाय आणखी काही वेगळी लक्षणंही दिसू शकतात. त्यामुळे अचानक जाणवणारी चक्कर, मळमळ, थंड घाम किंवा शरीराच्या इतर भागात होणारा त्रास केवळ सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं

छातीत दुखण्याऐवजी दबाव जाणवू शकतो

महिलांना हार्ट अटॅकच्या वेळी छातीत वेदना, अस्वस्थता किंवा दबाव जाणवू शकतो. काही वेळा छातीवर जड वस्तू ठेवल्यासारखं किंवा छाती आवळल्यासारखं वाटू शकतं. हा त्रास काही मिनिटे राहू शकतो किंवा कमी जास्त जाणवू शकतो.

Loading...

हात पाठ, मान किंवा जबड्यात दुखू शकतं

हार्ट अटॅकचा त्रास फक्त छातीपुरता मर्यादित असेलच असं नाही. एका किंवा दोन्ही हातांमध्ये ,पाठीत,मानेत किंवा जबड्यातही वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते.त्यामुळे अचानक अशा प्रकारचा त्रास सुरू झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका

 

अचानक त्रास घेण्यास त्रास

काही महिलांमधे छातीत स्पष्ट वेदना नसतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अचानक धाप लागणे किंवा श्वास घेणं कठीण जाणवणं हेही हॉर्ट अटॅकच्या लक्षणांपैकी एक आहे.

चक्कर मळमळ आणि थंड घाम

चक्कर येणे, मळमळ किंवा उलटी होणे आणि अचानक थंड घाम फुटणे ही लक्षणं अनेकदा पोटाचा त्रास, फ्लू किंवा स्ट्रेसशी जोडलेली असतात. मात्र ही लक्षणं अचानक आणि जोरात जाणवत असतील तर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 

लक्षणं जाणवल्यास काय करावं?

वरील प्रमाणे लक्षणं जाणवल्यास कोणतेही घरगुती उपाय न करू नये. याशिवाय डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.हॉर्ट अटॅकची लक्षणं व्यक्तीनुसार बदलू शकतात. काही वेळा छातीत दुखत नसतानाही ही लक्षणं दिसू शकतात. अचानक अशी लक्षणं तीव्रतेने जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे

 

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us