काही कुटुंबांमध्ये फक्त मुली किंवा फक्त मुलगेच का जन्माला येतात?

कधी तुम्ही विचार केला आहे की, काही कुटुंबांमध्ये सतत एकाच लिंगाची (Gender) मुले का जन्माला येतात? बहुतेक लोक याला 'नशिबाचा खेळ' मानतात. मात्र, वैज्ञानिकांनी याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचे निष्कर्ष काय आहेत ? हे सविस्तर वाचा...

काही कुटुंबांमध्ये फक्त मुली किंवा फक्त मुलगेच का जन्माला येतात?
Son and Daughter
Image Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Aug 01, 2025 | 7:13 PM

मुलांना निसर्गाचे वरदान मानले जाते. कधी कुणाकडे मुलगा जन्माला येतो, तर कधी मुलगी. पण काही कुटुंबांमध्ये नेहमीच जास्त मुले जन्माला येतात, तर काही कुटुंबांमध्ये मुलींची संख्या जास्त असते. कधी तुम्ही विचार केला आहे की, काही कुटुंबांमध्ये सतत एकाच लिंगाची मुले का जन्माला येतात? बहुतेक लोक याला ‘नशिबाचा खेळ’ मानतात. मात्र, काही वैज्ञानिकांनी याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी 1946 ते 2015 दरम्यान जन्मलेल्या 58,000 हून अधिक महिला नर्सच्या जन्म नोंदींचा अभ्यास केला आणि त्यातून काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत.

अभ्यासात धक्कादायक खुलासा:

अभ्यासानुसार, जर एखाद्या कुटुंबात आधीच तीन मुलगे असतील, तर चौथे बाळ मुलगा असण्याची 61% शक्यता आहे. त्याचप्रमाणे, जर तीन मुली असतील, तर चौथी संतान मुलगी असण्याची 58% शक्यता आहे. याचा अर्थ असा की, कुटुंबात आधीपासून ज्या लिंगाची मुले आहेत, पुढील मुलाचे लिंगही तेच असण्याची शक्यता वाढते.

आत्तापर्यंत असे मानले जात होते की, प्रत्येक गर्भधारणेत मुलगा किंवा मुलगी होण्याची शक्यता 50-50% असते. पण या नवीन अभ्यासाने या पारंपरिक मान्यतेला आव्हान दिले आहे. संशोधकांच्या मते, आता डॉक्टरांना ही माहिती द्यावी लागेल की, भिन्न लिंगाचे बाळ होण्याची शक्यता प्रत्यक्षात 50% पेक्षाही कमी असू शकते, खासकरून जेव्हा कुटुंबात आधीच एकाच लिंगाची अनेक मुले असतील.

वय आणि ‘शरीराची केमिस्ट्री’चा संबंध:

अभ्यासात असेही समोर आले आहे की, ज्या महिला 29 वर्षे किंवा त्याहून अधिक वयात पहिल्यांदा आई झाल्या, त्यांच्या सर्व मुलांचे लिंग एकच असण्याची शक्यता, 23 वर्षांपेक्षा कमी वयात आई होणाऱ्या महिलांच्या तुलनेत 13% अधिक असते. यामागे एक कारण असे असू शकते की, वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरातील ‘केमिस्ट्री’ बदलते, जसे की ‘योनीतील पीएच लेव्हल’ यामुळे विशिष्ट प्रकारचे शुक्राणू (Sperm) अंडाशयापर्यंत (Ovum) पोहोचण्यास अधिक अनुकूलता मिळू शकते.

हा अभ्यास केवळ मातांवर आधारित होता, परंतु संशोधकांचे मानणे आहे की, वडिलांशी संबंधित घटकही यात भूमिका बजावू शकतात. हा अभ्यास अजून केवळ एक सुरुवात आहे आणि येत्या वर्षांमध्ये या विषयावर अधिक सखोल संशोधन केले जाईल. तर, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या कुटुंबात फक्त चार मुली किंवा चार मुलगे पाहिल्यास, समजून घ्या की हा केवळ योगायोग नाही, तर विज्ञानाचाही परिणाम असू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)