Kitchen Tips : स्टीलच्या भांड्यावर निळे, जांभळे डाग का पडलेत ? स्वयंपाक करण्याआधी जाणून घ्या या गोष्टी

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलच्या भांड्यावर निळे, जांभळे रंगीबेरंगी पडलेत? जाणून घ्या त्या भांड्यात जेवण करणे चांगले आहे कि घातक. याशिवाय जाणून घ्या डाग घालवण्याचे सोप्पे घरगुती पर्याय

Kitchen Tips : स्टीलच्या भांड्यावर निळे, जांभळे डाग का पडलेत ? स्वयंपाक करण्याआधी जाणून घ्या या गोष्टी
stain on steel vessel
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 5:56 PM

स्वयंपाकघरात स्टिलची भांडी रोज वापरली जातात.मात्र कधी कधी पॅन किंवा कढईवर निळे, जांभळे, पिवळे किंवा इंद्रधनुष्यासारखे रंग दिसू लागतात. हे डाग पाहून अनेकांना भांड जळालं किंवा खराब झालं असं वाटतं. काही जण तर अशा भांड्यात पुन्हा स्वयंपाक करणं सुरक्षित आहे कि नाही, याचीही चिंता करतात. पण प्रत्येक वेळी काळजी करण्याची गरज नसते. हे रंग साधारणपणे भांड जास्त तापल्यामुळे तयार होतात. त्यांना हीट टींट असं म्हटलं जातं.

स्टिलच्या भांड्यावर असे रंग का दिसतात?

स्टीलचं भांड खूप जास्त तापलं की त्याच्या वरच्या भागावर एक अतिशय पातळ थर तयार होतो. स्टिलमध्ये असलेले क्रोमियम हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे हा बदल होतो.

Loading...

भारतीय स्वयंपाकघरात असे डाग जास्त दिसतात

भारतीय स्वयंपाकघरात अनेकदा जास्त आचेवर तेल गरम करणं, तडका देणं किंवा पदार्थ पटकन परतणं असं होतं. त्यामुळे स्टिलची भांडी जास्त तापतात. विशेषत: रिकामं भांड बराच वेळ गॅसवर ठेवलं तर अशा प्रकारचे डाग पडण्याची शक्यता असते.

 

पांढऱ्या व्हिनेगरने डाग स्वच्छ करा

हे रंग काढून भांड्याची चमक परत आणायची असेल तर पांढरे व्हिनेगर वापरता येईल. डाग पडलेल्या भागावर थोड व्हिनेगर लावून साधारण एक मिनिट ठेवा. त्यानंतर मऊ कपड्याने किंवा सॉफ्ट स्पंजने हलक्या हाताने पुसा. शेवटी स्वच्छ पाण्याने भांड धुवून पूर्णपणे कोरडं करा.

 

व्हिनेगर नसेल तर लिंबाचा वापर करा

घरात व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रसही वापरता येतो.डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा आणि काही वेळाने मऊ कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर भांड पाण्याने स्वच्छ धुवा.

स्टिलचा खडबडीत स्क्रबर वापरू नका

डाग निघत नाहीत म्हणून स्टीलची जाळी किंवा खूप खडबडीत स्क्रबरने भांड जोरात घासू नका.यामुळे स्टिलच्या वरच्या भागावर ओरखडे पडू शकतात.गरज असल्यास माईल्ड स्टिल क्लिनर आणि मऊ कपड्याचा वापर करता येतो.

 

पुन्हा असे डाग पडू नयेत म्हणून काय करावे?

पुन्हा असे डाग पडू नयेत यासाठी रिकांमं भांडं जास्त वेळ मोठ्या आचेवर ठेवू नका. शक्यतो मध्यम आचेवर स्वयंपाक करा आणि वापरल्यानंतर भांडं बराच वेळ गरम गॅसवर ठेवणं टाळा. यामुळे स्टीलच्या भांड्यावर दिसणारे असे रंगीत डाग कमी होण्यास मदत होऊ शकते.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us