Kitchen Tips : महिलांनो किचनमध्ये काम करताना ‘या’ चुका कधीच करु नका, तिसरी चूक पडेल महागात
Kitchen Tips : किचनमध्ये पाय ठेवण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर किचनमध्ये काय करताना काही चुका कधीच करु नका. तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चुका...

Kitchen Tips : किचन कधीची स्वच्छ असलाच पाहिजे, असं घरातील वरिष्ठ महिला कायम सांगत असतात. पण रोजच्या कामाच्या गडबडीत काही कामं राहून जातात. पण किचनमध्ये काम करताना आणि काम पूर्ण झालं की कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे… हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं असतं. सांगायचं झालं, तर ज्या किचनमध्ये विविध पदार्थ बनवले जातात, त्याचाही आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. किचनची स्वच्छता संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याशी आणि कल्याणाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे, आपण किचनच्या स्वच्छतेची थोडी अधिक काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकजण स्वयंपाकघर स्वच्छ ठेवतो. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवले असले तरी, नकळतपणे आपण किचनमध्ये करत असलेल्या काही चुकांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. तर जाणून घ्या किचनमध्ये कोणत्या चुका करु नये.
प्रत्येक कामासाठी एकच कापड वापरणं: हात पुसण्यासाठी, गरम भांडी धरण्यासाठी आणि ओट्या स्वच्छ करण्यासाठी कापडाची गरज असते. काही लोक या सर्व कामांसाठी एकच कापड वापरतात. यामुळे घाणेरड्या कापडावरील जंतू अन्नामध्ये पसरून ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून प्रत्येक कामासाठी वेगवेगळे स्वच्छ कापड वापरा. प्रत्येक वापरानंतर कापड पूर्णपणे स्वच्छ करा.
हात न धुता वारंवार रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडणे: आपण फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडतो. अनेकदा आपण हात न धुताच फ्रिजचा दरवाजा उघडतो. यामुळे आपल्या हातावरील घाण आणि जंतू दरवाजाच्या हँडलला चिकटतात. मग, जेव्हा दुसरी व्यक्ती त्याला स्पर्श करते. म्हणून फ्रिज उघडण्यापूर्वी आपले हात धुवा आणि फ्रिजच्या दरवाजाचे हँडल स्वच्छ करत राहा.
भांडी घासण्याचे स्पंज आणि स्क्रबर न बदलणे: बहुतेक लोक भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा स्पंज किंवा स्क्रबर खराब होईपर्यंत वापरतात. पण ही सवय चांगली नाही. कारण ओल्या स्पंजमध्ये जिवाणू आणि बुरशी वेगाने वाढतात. जर हे स्पंज वेळेवर बदलले नाहीत, तर त्यात जमा झालेले जिवाणू भांड्यांवर पसरतात. यामुळे आपल्या आरोग्याची स्थिती बिघडते.
कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र साठवणे: स्वयंपाकघरात, लोक अनेकदा कच्च्या भाज्या, मांस किंवा मासे शिजवलेल्या पदार्थांजवळ ठेवतात. यामुळे कच्च्या पदार्थांमधील जिवाणू शिजवलेल्या पदार्थांमध्ये पसरू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधेचा धोका वाढतो. म्हणून, कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची खात्री करा.
हात न धुता स्वयंपाक करणे: स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी आणि स्वयंपाक करण्यापूर्वी हात धुणं खूप महत्त्वाचं आहे. काही लोक बाहेरून आल्यावर हात न धुताच स्वयंपाकघरात काम सुरू करतात. यामुळे घाण आणि जीवाणू थेट अन्नामध्ये पसरतात. म्हणून, जेवण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाचे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी किमान वीस सेकंदांसाठी साबणाने हात धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे.