AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Genelia Deshmukh: त्या रात्री मी तुझ्या बाबाच्या कुशीत खूप रडले..; जिनिलिया देशमुखची अत्यंत भावूक पोस्ट

Genelia Deshmukh: मुलगा रियान देशमुखच्या वाढदिवसानिमित्त जिनिलिया देशमुखने भावूक पोस्ट लिहिली आहे. 24 नोव्हेंबर 2014 च्या रात्रीची आठवण सांगताना तिने आई होण्याचा अनुभव शेअर केला आहे.

| Updated on: Nov 25, 2026 | 12:07 PM
Share
अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. दोघंही सोशल मीडियावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. जिनिलिया आणि रितेश यांना रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत. आता मोठा मुलगा रियानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिनिलियाने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.

1 / 5
रियानच्या जन्माआधीची रात्र, आई होण्याचा अनुभव आणि मुलाबद्दलचं प्रेम या सगळ्या भावना तिने या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने लिहिलं, 'मला 24 नोव्हेंबरची ती रात्र आजही आठवते. मी त्यावेळी गरोदर होते आणि मला सांगण्यात आलं होतं की, 25 नोव्हेंबरला माझं बाळ जन्माला येणार आहे. पण याचा नेमका अर्थ काय असतो, याची मला कल्पनाही नव्हती. त्या रात्री मी तुझ्या बाबांच्या कुशीत खूप रडले होते. कारण पुढे माझी काय अवस्था होणार आहे, काय घडणार आहे, याची मला काहीच कल्पना नव्हती.'

2 / 5
'आणि मग 25 नोव्हेंबरचा दिवस उजाडला. एक छोटंसं बाळ जन्माला आलं आणि त्याचबरोबर एका आईचाही जन्म झाला. रियाान, हा दिवस माझ्यासाठी काय अर्थ घेऊन येतो, हे तुला कसं समजावून सांगावं, हेच मला कळत नाही. पण मला वाटतं, मी ते कधीच शब्दांत सांगू शकणार नाही. कारण हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि तुझ्या बाबांच्याही आयुष्यातील. 25 नोव्हेंबर 2014. माझ्या लाडक्या बाळा, मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की, आयुष्य तुला कुठेही घेऊन जावो, कोणत्याही परिस्थितीत तू असलास, तरी मी कायम तुझ्या पाठीशी असेन,' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

3 / 5
'हॅपी बर्थडे बेबी बॉय! तू मला आई ही ओळख दिलीस आणि आयुष्यभर या ओळखीला पात्र ठरण्याचा मी प्रयत्न करत राहीन,' असं तिने पोस्टच्या शेवटी लिहिलं. जिनिलियाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी रियानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी आई आणि मुलामधील सुंदर नात्याचं कौतुक केलं आहे.

4 / 5
जिनिलिया आणि रितेश यांनी 2012 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2014 मध्ये रियान आणि 2016 मध्ये राहिलचा जन्म झाला. दोघंही आपल्या मुलांसोबतचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. जिनिलियाची ही पोस्ट मात्र तिच्या आयुष्यातील आईपणाच्या प्रवासाची सुंदर आठवण करून देणारी ठरली आहे.

5 / 5
Follow Us
राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा...
Raj thackeray : राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी....
Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?