Jo Bache Hain Sang Samet Lo Trailer: पाकिस्तानची पहिली नेटफ्लिक्स सीरिज, ट्रेलर येताच खळबळ! थेट भारतात बंदी घालण्याची मागणी
Jo Bache Hain Sang Samet Lo Trailer: सध्या जगभरात पाकिस्तानमधली पहिली नेटफ्लिक्स सीरिज ‘जो बचे हैं संग समेट लो’ची चर्चा सुरु आहे. या सीरिजचा ट्रेलर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण या सीरिजवर भारतात बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

पाकिस्तानची पहिली नेटफ्लिक्स सिरीज ‘जो बचे हैं संग समेट लो’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये पाकिस्तानी स्टार फवाद खान आणि माहिरा खान यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात प्रेम, नाती, जुन्या जखमा आणि अपूर्ण भावनांची कथा आहे. ४ डिसेंबर २०२६ रोजी रिलीज होणाऱ्या या सिरीजबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. तर भारतात यावर बंदीचीही मागणी होत आहे. याची कथा प्रसिद्ध लेखिका फरहत इश्तियाक यांच्या लोकप्रिय उर्दू कादंबरीवर आधारित आहे. सिरीजमध्ये केवळ एक प्रेमकथा नाही, तर तीन पिढ्या आणि वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या अनेक कथांच्या माध्यमातून प्रेमाचे बदलते अर्थ दाखवले जाणार आहेत.
फवाद खान आणि माहिरा खान एकत्र
‘जो बचे हैं संग समेट लो’ या सीरिजच्या ट्रेलरची सर्वात खास गोष्ट म्हणजे पाकिस्तानी मनोरंजन जगतातील चर्चित आणि सुपरस्टार एकत्र दिसणार आहेत. फवाद खान, माहिरा खान, सनम सईद, अहद रजा मीर, हमजा अली अब्बासी, हानिया आमिर, इकरा अजीज, माया अली आणि बिलाल अशरफ असे कलाकार सिरीजचे भाग आहेत. फवाद खान आणि माहिरा खान या सिरीजची सर्वात मोठी यूएसपी आहेत. दोघांची जुनी ऑनस्क्रीन केमिस्ट्री सुपरहिट राहिली आहे. तर फवाद आणि सनम सईद यांची जोडीही ट्रेलरमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. माहिरा यांच्या भावनिक अंदाजातून आणि इतर कलाकारांच्या झलकमधून कथा नात्यांच्या अनेक पैलूंशी जोडली गेलेली दिसते.
वाचा: पाकिस्तानमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती?
तीन पिढ्यांच्या कथेत प्रेमासोबत वेदनाही
‘जो बचे हैं संग समेट लो’ ची कथा प्रेम, नुकसान, क्षमा आणि स्वतःला ओळखण्याच्या प्रवासावर आधारित आहे. यात वेगवेगळ्या पिढ्यांच्या नात्यांचा आणि त्यांच्या निर्णयांचा पुढील आयुष्यावर होणारा परिणाम दाखवला जाईल. रोम आणि पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर रचलेली कथा नाती, भावना आणि आयुष्यातील कठीण निर्णय समोर आणते. मोमिना दुराईद यांच्या दिग्दर्शनात आणि निर्मितीत बनलेल्या या सिरीजचे संगीत रोहेल हयात यांनी तयार केले आहे. सिरीज दोन भागांत रिलीज केली जाईल. पहिला भाग ४ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर येईल, तर दुसरा भाग नंतर रिलीज केला जाईल.
