AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थरकाप उडवणारी घटना… जळगावच्या 6 मजुरांना गुजरातच्या कालव्यात फेकले, तिघांचा मृत्यू; दोन्ही राज्यात खळबळ

गुजरातमध्ये जळगावच्या 6 मजुरांना कालव्यात फेकण्यात आले. यात पती-पत्नीसह एका मुलीचा मृत्यू झाला असून, दोन मुले बेपत्ता आहेत. एका मुलाने जीव वाचवला. सुरत पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली आहेत. या थरारक घटनेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

थरकाप उडवणारी घटना... जळगावच्या 6 मजुरांना गुजरातच्या कालव्यात फेकले, तिघांचा मृत्यू; दोन्ही राज्यात खळबळ
Surat Bardoli canal incidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 11:58 AM
Share

गुजरातमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातच्या उवा गावाजवळील एका कालव्यात जळगावमधील 6 मजुरांना फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पती-पत्नीसह एक मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला असून दोन मुले बेपत्ता आहेत. तर एक मुलगा बचावला असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बेपत्ता मुलांचा पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सूरत जिल्ह्यातील बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मृतांमध्ये नितीन ऊर्फ भुरिया पाटील आणि कविता पाटील यांचा समावेश आहे. महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरातील कालव्यात या तिघांचे मृतदेह आढळले आहेत.

कारमधून आले आणि…

21 नोव्हेंबरमध्ये कामाच्या शोधात जळगावच्या एरंडोल तालुक्यातील गावावरून हे मजूर कुटुंब चारचाकीने सूरतकडे निघाले होते. उवा गावाजवळ दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी या कुटुंबाची गाडी अडवून कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने कालव्याच्या खोल पाण्यात फेकले. उकाई काकरापार लेफ्ट बँकेच्या कालव्यात या मजुरांना फेकून देण्यात आले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. दोघे बेपत्ता आहेत. तर 13 वर्षीय मुलाने पाईप पकडून स्वतःचा जीव वाचवला आणि कालव्यातून बाहेर पडल्यानंतर जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.

आठ स्वतंत्र पथके स्थापन

प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता असून बेपत्ता मुलांच्या शोधासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू केली आहे. या कुटुंबाला कालव्यात फेकण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींचा शोध आणि घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांची आठ स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. जळगाव पोलीस देखील सूरत ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या धक्कादायक घटनेने जळगावसह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे.

हत्येचं प्रकरण?

सूरत ग्रामीण पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा हत्येच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटली आहे. त्यांच्या अटकेसाठी 60 पोलिसांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती सूरत ग्रामीणचे एसपी राजेश गढिया यांनी दिली आहे. या शोधकार्यात एलसीबी, एसओजी, पॅरोल फर्लो, स्थानिक डी स्टाफ, टेक्निकल टीम आणि डीवायएसपीची टीम सहभागी आहे. बारडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा...
Raj thackeray : राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी....
Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?