World Tourism Day 2022: आज आहे जागतिक पर्यटन दिन, जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात ?

27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी झाली होती, जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचा उद्देश काय आहे, आणि यंदाची थीम काय आहे, हे सर्व जाणून घेऊया.

World Tourism Day 2022: आज आहे जागतिक पर्यटन दिन, जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात ?
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 9:21 PM

बऱ्याच लोकांना फिरण्याची खूप आवड असते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे (Busy Lifestyle) लोकांना त्यांच्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत बरेच जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात, जेणेकरून त्यांना त्यांचे कुटुंबिय, जोडीदार आणि मित्रांसह काही वेळ घालवता येईल. सीझननुसार, लोकं फिरण्याचा प्लान आखतात. पर्यटनाचे क्षेत्र हे बहुतेकांच्या रोजगाराचे साधनही आहे. अनेक लोकांची घर पर्यटनावर चालतात. आज 27 सप्टेंबर, म्हणजेच जागतिक पर्यटन दिवस (World Tourism Day). आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन वाढावे हा, जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या दिवसाची सुरूवात कशी झाली, त्याचा उद्देश काय आणि यंदाची थीम (theme of 2022) काय आहे, हे जाणून घेऊया.

कधी झाली जागतिक पर्यटन दिवसाची सुरूवात ?

जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. त्यानंतर 27 सप्टेंबर, 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.तेव्हापासून दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.

काय आहे जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश ?

पर्यटनाला चालना देणे हा, जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकेल. लोक जेव्हा फिरायला जातात, तेव्हा तेथेच थांबतात, खातात-पितात आणि खरेदीही करतात. यामुळे पर्यटन आणि रोजगारालाही चालना मिळते.

पर्यटनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी, दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. लोकांना पर्यटन स्थळांकडे आकर्षित केले जाते.

जागतिक पर्यटन दिवस 2022 ची थीम

दरवर्षी पर्यटन दिवस हा वेगवेगळ्या संकल्पनेवर साजरा केला जातो. ‘पर्यटनावर पुनर्विचार’ ही यंदाच्या (2022) पर्यटन दिवसाची थीम आहे. याचा अर्थ आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारीमुळे पर्यटन क्षेत्रावर खूप वाईट परिणाम झाला.

अशा परिस्थितीत, या काळात पर्यटन क्षेत्राकडे पुरेसं लक्ष द्यायला हवं. नव्या बदलांद्वारे (पर्यटन) ते सोपं करून त्या माध्यमातून पुढे न्यायला हवं. यंदा पर्यटन दिन साजरा करण्याचे यजमानपद इंडोनेशिया भूषवत आहे.

फिरण्याचे फायदे

आजकाल व्यस्त जीवनामुळे लोकं स्वत:च्या कुटुंबासाठी काय, अगदी स्वत:साठीही थोडाही वेळ काढू शकत नाहीयेत. दररोज तेच-तेच काम करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही दमायला होतं. अशा वेळी एक छोटासा ब्रेक घेऊन फिरायला जाणं खूप महत्वपूर्ण ठरतं.

ते स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतं. त्यामुळे तुमचं मनही शांत राहतं आणि तुमची (ऑफीसमधील) कामगिरीही सुधारते. त्यामुळे फिरणं हे सर्वांसाठी गरजेचं आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.