पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ; कोरेगाव-भीमा ऐतिहासिक विजयस्तंभाच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी मंजूर

महानगपालिकेने कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभासाठी दिलेल्या 1 कोटीच्या निधीमुळे या परिसराचा विकास करण्यास मोठी मदत होणार आहे.  कोरेगाव-भीमा याठिकाणी ऐतिहासिक विजयस्तंभ आहे. या रणस्तंभाला संपूर्ण देशासह जागतिक पातळीवर वेगळे महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षापासून देशाच्या विविध भागातून लाखो अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतात.

पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ; कोरेगाव-भीमा ऐतिहासिक विजयस्तंभाच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी मंजूर
भीमा कोरेगाव
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 1:06 PM

पुणे – शहराजवळच्या कोरेगाव- भीमा ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसराचा विकास व सुशोभीकरणासाठी पुणे महापालिकेने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रसाने रासने व इतर सदस्यांनीमिळून हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. स्थायी समिती सदस्य नगरसेवक राहुल भंडारे याने विजयस्तंभाच्या विकासाठी निधीची मागणी केली होती.

विकासासाठी होणार मोठी मदत

महानगपालिकेने कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभासाठी दिलेल्या 1 कोटीच्या निधीमुळे या परिसराचा विकास करण्यास मोठी मदत होणार आहे.  कोरेगाव-भीमा याठिकाणी ऐतिहासिक विजयस्तंभ आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेली होती. त्यामुळे या रणस्तंभाला संपूर्ण देशासह जागतिक पातळीवर वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून देशाच्या विविध भागातून लाखो अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतात. 2018 मध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे ही कोरेगाव भीमा अधिक चर्चेत आले होते.

हा आहे कोरेगावचा-भीमा इतिहास ?

कोरेगाव- भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या 30 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शुरवीरांना हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. 1927 सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली.

देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीचं कारण गुलदस्त्यात

Homemade Body Pack : मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी ‘हे’ घरगुती बॉडी पॅक फायदेशीर, वाचा! 

तुम्हाला दिसणारा हा पारवा नाही, तर हा आहे…, व्हिडीओ पाहा आणि जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.