देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीचं कारण गुलदस्त्यात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. फडणवीस यांच्यासोबत अमृता फडणवीसही आहेत. मात्र, या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे.

देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीचं कारण गुलदस्त्यात
राज ठाकरे देवेंद्र फडणवीस

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. फडणवीस यांच्यासोबत अमृता फडणवीसही आहेत. मात्र, या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आज अचानक राज ठाकरे यांच्या घरी आले. ही कौटुंबीक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात हे दोन्ही नेते हास्यविनोद करताना दिसत आहेत.

पहिल्यांदाच नव्या घरी भेट

देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज हे नव्या घरात राहायला आल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. शिवाय पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. भाजप आणि मनसे दरम्यानच्या युतीच्या चर्चा मधल्या काळात जोर धरत होत्या. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राऊत, सचिननेही घेतली भेट

राज ठाकरे हे शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राहायला आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्या घरी सपत्नीक आले होते. यावेळी राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं. राऊत हे राज यांच्या घरी सुमारे अर्धा तास होते. या दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही राज यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज फडणवीसांनी राज यांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

संबंधित बातम्या:

Homemade Body Pack : मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी ‘हे’ घरगुती बॉडी पॅक फायदेशीर, वाचा! 

परभणीत राष्ट्रवादीला धक्का; जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचा राजीनामा, नेमके कारण गुलदस्त्यात

नेतृत्व करण्यासाठीच या 4 राशी जन्माला येतात, काही क्षणातच लोकांचे मन जिंकून घेतात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI