सिंधुदुर्गातील तब्बल 19 चेक पोस्ट नाके तडकाफडकी बंद

सिंधुदुर्ग: पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गातील पोलिसांचे चेक नाके अचानकपणे बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 19 ठिकाणी चेक पोस्ट कार्यरत होते, मात्र आता हे चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी घेतला आहे. “सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस बळ कमी आहे. ज्या हेतूने हे चेक पोस्ट तयार झाले होते, ते हेतू साध्य करण्यासाठी …

Latest Updates, सिंधुदुर्गातील तब्बल 19 चेक पोस्ट नाके तडकाफडकी बंद

सिंधुदुर्ग: पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गातील पोलिसांचे चेक नाके अचानकपणे बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 19 ठिकाणी चेक पोस्ट कार्यरत होते, मात्र आता हे चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी घेतला आहे.

“सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस बळ कमी आहे. ज्या हेतूने हे चेक पोस्ट तयार झाले होते, ते हेतू साध्य करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान अर्थात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे आहे. आम्हाला एवढे चेक पोस्ट कार्यान्वित ठेवणे रास्त वाटत नाही म्हणून बंद करण्यात येत आहे”, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सांगितलं.

खरंतर या चेक नाक्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास दिला जात होता, त्यामुळे अधीक्षकांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. आंतरराज्य सीमेवरील 5 चेकनाके मात्र सुरुच राहणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *