मोठा दिलासा! 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी जमा

शिंदे-फडणवीस सरकराने मोठी घोषणा करत राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे.

मोठा दिलासा! 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी जमा
Farmer Incentive subsidy
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Oct 20, 2022 | 7:41 PM

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकराने मोठी घोषणा करत राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी रुपये एकाचवेळी जमा करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकाचवेळी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे आश्वासनही मुख्यमंत्र्यानी दिले आहे.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेत बळीराजाची दिवाळी गोड केली आहे. भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा देखील या बैठकीत करण्यात आलेय.

शेतकऱ्यांची जवळपास 964 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश शिंदे-फडणवीस सरकारने दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
गृह, महसूल, पणन, उच्च व तंत्र शिक्षण ते वैद्यकीय, कृषी व महिला विकास अशा वेगवेगळ्या विभागांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.