भिवंडीत कोसळली चार मजली इमारत, बचावकार्य सुरू, 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, प्रशासनाने..

Bhiwandi Building Collapses : भिवंडी येथे एक चार मजली इमारत कोसळली आहे. काल रात्रीपासून बचावकार्य राबवले जात आहे. एका महिलेला ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आले. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळतंय.

भिवंडीत कोसळली चार मजली इमारत, बचावकार्य सुरू, 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, प्रशासनाने..
Bhiwandi Building Collapses
| Updated on: Jul 31, 2026 | 7:25 AM

भिवंडी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीचा भाग कोसळला आहे. काही जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळतंय. बचावकार्य प्रशासनाकडून सुरू आहे. एनडीआरएफचे (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्यातून एका महिलेची सुटका केली. काही प्रमाणात महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारत कोसळून काही तास झाली आहे. पण बचावकार्य अजून सुरूच आहे. ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ही घटना रात्री घडली. ही इमारत जीर्ण अवस्थेत होती.  सध्या या इमारतीचे दुरूस्तीचे काम सुरू होते. दुरूस्तीचे काम सुरू असतानाच इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळतंय. ढिगाऱ्याखाली पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ (NDRF) आणि पोलीस बचावकार्य करत आहेत. लोकांची गर्दी घटनास्थळी जमत असल्याने बचावकार्याला अडथळा निर्माण होत आहे.

गुरूवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान ही इमारती पत्त्यांसारखी कोसळली. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य राबवण्यात आले. इमारती्च्या सुरूवातीला असलेली चाळ जेसीबीच्या मदतीने तोडून दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचल्या. कोहिनूर अपार्टमेंट 2012 मध्ये बनवण्यात आली. मात्र, कमकुवत काम असल्याने इमारतीला धोकादायक जाहीर करण्यात आले.

एका विंगमधील तळमजल्यावर काही पिलर खराब झाल्याने दुरूस्तीचे काम सुरू होते. यादरम्यानच इमारतीला तडे जाण्यास सुरूवात झाली. रात्री आठ वाजता इमारत एका बाजूने झुकताना दिसली. ज्यानंतर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत, त्यांनी इमारत रिकामी केली. मात्र, तळमजल्यावर साहित्य घेण्यासाठी काहीजण आतमध्ये गेले त्यावेळी इमारत कोसळली.

ढिगाऱ्याखाली पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जातंय. महापालिकेने वीज कनेक्शन आणि पाणी कनेक्शन तोडल्यानंतरही काहीजण इमारतीमध्ये राहत होते. त्यांना पोलिस बंदोबस्त घेऊन बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केली जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us