AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Update Today : पावसाचं चक्र अचानक फिरलं, महाराष्ट्रासाठी IMD चा तातडीचा अलर्ट; कुठे धो-धो बरसणार?

सध्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागात पाऊस परतला आहे. पुढील काही दिवस पासवाच्या सरी अशाच बरसणार आहेत. याच पावसाच्या अंदाजाबाबत IMD ने महत्त्वाची माहिती दिली आहे. या काळात पावसाची शक्यता लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

IMD Rain Update Today : पावसाचं चक्र अचानक फिरलं, महाराष्ट्रासाठी IMD चा तातडीचा अलर्ट; कुठे धो-धो बरसणार?
maharashtra rain update todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2026 | 6:26 PM
Share

Maharashtra Rain Update Today : भारतीय हवामान विभागाने पुढील सात दिवस खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. या सात दिवसांत देशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. या अंदाजानुसार उत्तर भारतात 30 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत एकूण सात दिवसात वेगवेगळ्या राज्यात पाऊस होईल. म्हणूनच पावसाच्या या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठीही हवामान विभागाने महत्त्वाचे अलर्ट जारी केला आहे.

कोणकोणत्या राज्यात पाऊस होणार?

हिमाचल प्रदेशळ, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड या राज्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह चांगला पाऊस होणार आहे. 30 जुलैनंतर 4 ऑगस्टपर्यंत राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब राज्यांत ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहेत. या काळात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटही होईल. तीन ते 5 ऑगस्ट या काळात पश्चिम उत्तर प्रदेश, दोन ते पाच ऑगस्ट या काळात उत्तर प्रदेशातील उत्तरेकडील भागात पाऊस होणार आहे. 30 जुलै ते 5 ऑगस्ट या काळात जम्मू काश्मीर, लडाख या भागातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासाठी नेमका काय अलर्ट?

सध्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागात पाऊस परतला आहे. पुढील काही दिवस पासवाच्या सरी अशाच बरसणार आहेत. याच पावसाच्या अंदाजाबाबत IMD ने महत्त्वाची माहिती दिली आहे. या काळात पावसाची शक्यता लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. IMD च्या अंदाजानुसार 30 ते 31 जुलै या काळात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो. 30 ते 31 जुलै या काळात मराठवाड्यातही सरी बरसू शकतात. विदर्भातही या काळात पाऊस कोसळू शकतो. या काळात विजेच्या कडकडाटही होण्याची शक्यता आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी या काळात झाडाखाली बसू नये. शेतीची कामे अगोदरच संपवावीत. पुढील काही दिवस पाऊस असल्याने त्यानुसारच आपले नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी

जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. सायंकाळच्या सुमारास देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.  हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात पाच दिवसांसाठी रेड ॲलर्ट जाहीर केला आहे. दिवसभरापासून सुरू पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची 29 टक्क्यांची तूट भरून निघण्याची शक्यता आहे. पावसाअभावी रोग आणि संकटात सापडलेल्या पिकांना दिवसभराच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा