ShahRukh Khan : मन्नत विकून टाक रे… नाराज चाहत्याचा शाहरुखला सल्ला; किंग खानचा भन्नाट रिप्लाय
AskSRK : शाहरुख खान बऱ्याच काळापासून त्याच्या 'किंग' या आगामी चित्रपटात बिझी आहे. हा पिक्चर रिलीज होण्यास 100 दिवस बाकी आहेत. याचदरम्यान त्याने X वरून चाहत्यांशी गप्पा मारल्या, मात्र तेव्हा एक चाहता त्याच्यावर चांगलाच नाराज झालेला दिसला.

Shah Rukh Khan Ask SRK : बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान (ShahRukh Khan) हा गेल्या कित्येक महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. तब्बल 3 वर्षांपूर्वी 2023 डिसेंबर मध्ये त्याचा शेवटचा चित्रपट रिलीज झाला होता, ज्याचं नाव होतं ‘डंकी’. मात्र त्यानंतर तो मोठ्या पडद्यावर दिसलाच नाही, त्यामुळे चाहते उत्सुकतेने वाट पहात आहेत. मात्र आता शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कारण शाहरुखच्या चित्रपटात लवकरच पाहता येणार असून चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. आता अवघ्याा 100 दिवसांनंतर ‘किंग’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शाहरुखने एक्सवर (पूर्वीच ट्विटर) ‘आस्क एसआरके’ हे सेशन घेत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना आपल्या खास आणि मिश्कील अंदाजात उत्तरं दिली.
‘मन्नत’बाबत चाहत्याचा सवाल, SRKचं भन्नाट उत्तर
शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्याशी संबंधित एक प्रश्नही या सेशनदरम्यान विचारण्यात आला. ईदच्या दिवशी शाहरुख आपल्या घराच्या बाहेर असलेल्या गॅलरीत येऊन चाहत्यांची भेट घेतो. मात्र, गेल्या वर्षी तो गॅलरीत दिसला नव्हता. त्यामुळे एका चाहत्याने त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. फैजान जागीरदार नावाच्या यूजरने शाहरुखला थेट म्हटलं, “सर, यावेळी गॅलरीत यायचं नसेल तर मन्नत विकून टाका.” मात्र त्या चाहत्याच्या या नाराजीवर शाहरुखनेही भन्नाट उत्तर दिलं. तो म्हणाला, “आता नवी गॅलरी बनवत आहे ना, त्यामुळे नव्या गॅलरीत आणखी चमकेन. अशीही आशा आहे की तिथे पकडण्यासाठी हँडलसुद्धा असेल.” त्याच्या या हजरजबाबीपणाचं कौतुक होतंय.
Ab new gallery bana rah hoon na so aur bhi chumkunga…on the new gallery. Also hopefully will have some handle to hold onto!! https://t.co/gOUfht6iXt
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 15, 2026
‘मन्नत’मध्ये मोठं काम सुरू
दरम्यान, शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याची माहिती आहे. बंगल्यातील सहा मजली इमारत आता आठ मजली केली जात आहे. म्हणजेच, त्यात आणखी दोन मजले वाढवले जाणार आहेत. मात्र, ‘मन्नत’चा मुख्य बंगला हेरिटेज प्रॉपर्टी असल्याने त्याच्या मूळ वास्तूमध्ये बदल करण्यात येत नाही. या संपूर्ण कामासाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च होणार असल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. बांधकाम सुरू असल्यामुळे शाहरुख सध्या आपल्या कुटुंबासोबत दुसऱ्या ठिकाणी राहत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
कधी रिलीज होणार किंग ?
शाहरुखच्या किंग या आगमी चित्रपटाच्याचा दिग्दर्शनाची धुरा निखिल आनंच्या खांद्यावर आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटातून शाहरुखची लाडकी लेक सुहाना ही देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यांच्या दोघांशिवाय या चित्रपटात दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ , राघव जुयालसह अनेक कलाकार झळकणार आहेत. या वर्षाअखेरीस, 24 डिसेंबर हा पिक्चर रिलीज होणार आहे.
