उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन, अध्यक्ष दिब्रिटोंच्या प्रकृतीत सुधारणा, तर धमकीनंतरही महानोर उपस्थित राहणार

उस्मानाबाद : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली (93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan). आजपासून तीन दिवस म्हणजे 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाला देशभरातील मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत (93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan). आज सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीपासून या संमेलनाला …

3rd akhil bhartiya marathi sahitya sammelan, उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन, अध्यक्ष दिब्रिटोंच्या प्रकृतीत सुधारणा, तर धमकीनंतरही महानोर उपस्थित राहणार" width="600" height="395">

उस्मानाबाद : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली (93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan). आजपासून तीन दिवस म्हणजे 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाला देशभरातील मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत (93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan).

आज सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीपासून या संमेलनाला सुरुवात झाली. संध्याकाळी 4 वाजता या संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्यामुळे ते उद्घाटनाला उपस्थित राहून अध्यक्षीय भाषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांना संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, महानोर यांना उद्घाटनाला उपस्थित न राहण्याचा धमकीचा फोन आला होता. मात्र, “तरीही आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू”, असे महानोर यांनी सांगितले आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर महानोर आणि दिब्रिटो यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले. ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र पुण्याच्या ब्राह्मण महासंघाने अध्यक्षपद निवडीवरुन विरोध केला. यानंतर महासंघाकडून संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांनाही कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, तरीही महानोर उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 10, 11 आणि 12 जानेवारी दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात कवीकट्टा आणि परिसंवाद सारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *