नागभीडकडे कारने जाणाऱ्या कुटुंबीयांवर काळाचा घाला, सहापैकी चार जण दगावले

| Updated on: Jun 04, 2023 | 7:32 PM

या अपघातात कारमधील एकूण सहा पैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. एक मुलगी आणि महिला गंभीर जखमी झालेली आहे. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. मृत दोन महिला आणि दोन पुरुष अजूनही कारमध्ये फसून आहेत.

नागभीडकडे कारने जाणाऱ्या कुटुंबीयांवर काळाचा घाला, सहापैकी चार जण दगावले
Follow us on

नीलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर :  नागभीडकडे जाणारे सहा जणांच्या कुटुंबीयांसोबत मोठा अपघात झाला. या अपघातात सहापैकी चार जण दगावले आहेत. या अपघातात दोन पुरुष आणि दोन महिला ठार झाल्या. तर एक मुलगी आणि महिला गंभीर जखमी झाली. अपघात येवढा भीषण होता की, कारमधून मृतदेह काढणे कठीण झाले होते. पोलीस आल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

सहापैकी चौघांचा मृत्यू

नागपूरवरून नागभीडकडे MH 49 BR 2242 या क्रमांकाच्या मारुती सुझुकी अल्टो या कार येत होती. नागभीडवरून नागपूरकडे जाणाऱ्या MH 33 T 2677 या क्रमांकाच्या ARB ट्रॅव्हल्सला चुकीच्या दिशेने धडक दिली. या अपघातात कारमधील एकूण सहा पैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला.

कार कापून मृतकांना काढण्याचे काम

एक मुलगी आणि महिला गंभीर जखमी झालेली आहे. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. मृत दोन महिला आणि दोन पुरुष अजूनही कारमध्ये फसून आहेत. घटनास्थळी नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोहचले आहेत. मृतकांना कार कापून काढण्याचे काम सुरू आहे.

अपघात एवढा भीषण होता की, मृतदेह काढणे सहज शक्य नव्हते. त्यासाठी कार कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. वृत्त लिहिस्तोवर मृतकांची नाव कळली नव्हती.

बस अपघातात २५ प्रवासी जखमी

धाराशिव जिल्ह्यातील बार्शी परंडा बसला मोठा अपघात झाला होता. यात जवळपास 25 प्रवासी जखमी झाले होते. त्याची आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.