ST NEWS : मनोरुग्ण महिलेने एसटीचं स्टेअरिंग घेतलं हातात, मग प्रवाशांनी…

| Updated on: Oct 09, 2023 | 3:42 PM

मनोरुग्ण महिलेने एसटी बसचं स्टेअरिंग घेतले हातात, मग तिथं असलेल्या प्रवाशांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढला. ज्यावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कानावर हा प्रकार गेला, त्यावेळी त्यांनी...

ST NEWS : मनोरुग्ण महिलेने एसटीचं स्टेअरिंग घेतलं हातात, मग प्रवाशांनी...
WASHIM BUS
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वाशिम : वाशिम (washim bus stand) बस स्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसचे स्टेअरिंग एका मनोरुग्ण महिलेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. वाशिम एसटी बस स्थानकावर रिसोडला जाणारी बस क्रमांक MH 06 S 8047 ही बस उभी करून चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षात गेल्यानंतर एक मनोरुग्ण महिला (Psychopath woman) बस चालकाच्या केबिनमध्ये घुसली आणि तिने स्टेअरिंगचा ताबा घेतला. ज्यावेळी ती महिला स्टेअरिंग हातात घेऊन बसली होती. त्यावेळी प्रवाशांच्या लक्षात आलं नाही. परंतु तिथं असलेल्या चालकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्या चालकाने (st driver) सगळ्यांना ही गोष्ट ओरडून सांगितली. त्यामुळे तिथं काहीवेळी गोंधळ निर्माण झाला होता.

काहीवेळाने एसटीचे सुरक्षा रक्षक, चालक आणि वाहकाने या महिलेला स्टेअरिंग सोडून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. अखेर त्या महिलेच्या मुलाने आणि सुरक्षा रक्षकांनी त्या मनोरुग्ण महिलेला बसच्या खाली उतरविल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

हे सुद्धा वाचा

एसटी बसला सुरू किंवा बंद करण्यासाठी चावी नसते, त्या बस विना चावी बटणावर सुरू होतात. सुदैवाने या बसला चावी होती. तसेच चालकाने चावी काढून बटन बंद केले होते. जर त्या बसला चावी असती, तर ती बस त्या मनोरुग्ण माहिलेने सुरू केल्यानंतर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे एसटी बस गाड्यांमधील चालकांच्या केबिनच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून एसटी महामंडळाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. एसटीच्या बस सुध्दा वारंवार ना दुरुस्त होत असल्यामुळे प्रवासी नाराज आहेत.