काय सांगता राव… पुण्यात सिगारेट ओढण्याचे आकडे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

| Updated on: Mar 09, 2023 | 9:59 AM

कोविड काळात सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी झाले होते. पुण्यातील महिन्याचे प्रमाण बघता एक कोटी सिगारेट वर आले होते. मात्र, नंतरच्या काळात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

काय सांगता राव... पुण्यात सिगारेट ओढण्याचे आकडे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल...
Image Credit source: Google
Follow us on

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : उच्चशिक्षित आणि सुजाण नागरिक असलेल्या पुण्यातून ( Pune News ) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. धूम्रपान हानिकारक आहे असं माहिती असून सुद्धा पुण्यात सिगारेट ओढण्याचे प्रमाण पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. पुण्यात दररोज तब्ब दहा कोटी सिगारेट ( Cigarettes smoke ) ओढल्या जातात. तर महिन्याला 300 कोटी सिगारेट ओढल्या जात असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी एका सर्वेक्षणात समोर आली असून 600 कोटींच्या वर ही उलाढाल होत आहे. यामध्ये आणखी एक गंभीर बाब म्हणजे सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरंतर धूम्रपान विरोधी दिन साजरा केला जातो. मात्र, या दिवशी सिगारेट ओढू नका, सिगारेट ओढल्याने काय नुकसान होते, शरीरासाठी ते किती घातक आहे याबाबत कुठेही जनजागृती केळी जात नाही.

कोविड काळात सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी झाले होते. पुण्यातील महिन्याचे प्रमाण बघता एक कोटी सिगारेट वर आले होते. मात्र, नंतरच्या काळात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

हे सुद्धा वाचा

पुणे शहर तसे आयटी हब म्हणूनही ओळखले जाते, याशिवाय शिक्षणाचे माहेर घर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात तरुणाई पुण्यात वास्तव्यास आहे. त्यामध्ये कुणी नोकरीच्या तर कुणी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात आले आहे.

त्यामुळे तलप म्हणून नाही तर फॅशन म्हणून सिगारेट ओढण्याचा कल पुण्यात समोर आला आहे. त्यामध्ये बाहेरून पुण्यात आलेल्या तरुणाईमध्ये हे प्रमाण अधिक असून पुण्यात जवळपास 200 हून अधिक कंपन्यांचे सिगारेट मिळतात.

पुण्यातील ठिकठिकाणी धूम्रपान करू नये असे फलक असले तरी ते नावालाच आहे. त्यामध्ये पुण्यात रोज तब्बल 10 कोटी, तर महिन्याला 300 कोटी सिगारेट ओढल्या जातात, त्यातून 600 कोटींची उलाढाल होते आहे.

सिगारेट ओढण्याचे प्रमाण तरुणांमध्ये सर्वाधिक असले तरी सिगारेटच्या किमतीत वाढ होत असली तरी सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी होत नसून वाढत चालले आहे. पुण्यातील ही आकडेवारी चिंतेची बाब बनत चालली आहे.

यामध्ये एक आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून महिलांसह तरुणी यांच्यात ही सिगारेट ओढण्याचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे. त्यामुळे पुण्यातील सिगारेट ओढण्याची समोर आलेली आकडेवारी आणि त्याहून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल अर्थातच चर्चेचा विषय ठरत आहे.