अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी, सत्तारांच्या विरोधात नाशकात निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी, सत्तारांच्या विरोधात नाशकात निदर्शने
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 07, 2022 | 6:56 PM

नाशिक : जो पर्यन्त अब्दुल सत्तार राजीनामा देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस निदर्शने करीत राहील असा पवित्रा नाशिकमध्ये घेण्यात आला आहे. शिर्डी येथील मंथन शिबिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर टीका करत असतांना पन्नास खोके घेतले नाही अशी असा कोणीही खुलासा केला नाही, त्यामुळे त्यांनी पन्नास खोके घेतले आहे असा निष्कर्ष काढत टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर बोलत असतांना खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावरून राज्यभर अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राण पेटले आहे. असे असतांना नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतिने अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. याशिवाय खोके ठेऊन सत्तार यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिलांनी जोडो मारत निदर्शने करत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटावर सातत्यानं पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली होती.

सुप्रिया सुळेंच्या टीकेला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत उत्तर दिले आहे. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी गुवाहाटीला जाण्यासाठी 50 कोटी म्हणजे 50 खोके घेतल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिंदे गटातल्या आमदारांबद्दल पन्नास खोके एकदम ओके असे संबोधले होते.

सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता या वाक्याचा सूड घेत सुळेंच्या टीकेबद्दल सत्तार यांनी कॅमेरासमोरच अश्लाघ्य शब्दात उत्तर दिलं आहे.

या अपशब्दाच्या विरोधात युवक राष्ट्रवादी आक्रमक झाली असून याचा निषेध म्हणून अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करत राजीनामा देत नाही तोपर्यन्त आंदोलन करू असा इशारा दिला आहे.