AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके काय निर्णय घेणार? केंद्रीय मंत्र्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी मोठी ऑफर

abhijeet dipke : अभिजीत दिपके यांना सातत्याने केंद्रीय मंत्र्यांकडून ऑफर दिली जात आहे. एकीकडे दिपके पोलिसांच्या कारवाईचा सामना करत आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री ऑफर देत आहे. त्यामुळे दिपके काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके काय निर्णय घेणार? केंद्रीय मंत्र्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी मोठी ऑफर
abhijeet dipke offerImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 1:26 PM
Share

कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंच्या टार्गेटवर धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. ज्ञानेश कुमार हे मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप दिपकेंनी केलाय. त्यानंतर अभिजीत दिपकेंसह इंडिया आघाडी देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दिपकेंना पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. दिपके यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात धाडण्यात आलं आहे. दिपकेंना एक राजीनामा मिळाला. परंतु दुसऱ्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणे योग्य नसल्याचे म्हणत पुन्हा केंद्रीय मंत्र्यांनी अभिजीत दिपकेंना मोठी ऑफर दिली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे काल धाराशीवच्या दौऱ्यावर होते. त्यांनी काल धाराशिवातून अभिजीत दिपकेंना आरपीआयमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. दिपके खरा आंबेडकरवादी असल्यास माझ्या पक्षात यावे, अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली होती. धाराशिवनंतर आज रामदास आठवले लातूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातही रामदास आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दिपकेंना  पुन्हा मोठी ऑफर दिली आहे.  ‘अभिजित दिपके रिपब्लिकन पक्षात आल्याने पक्ष सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना घेऊन व्यापक होईल, असं आठवलेंनी म्हटलं. एक राजीनामा मिळाला, आता दुसरा राजीनामा मागण्यासाठी सातत्याने आंदोलने करणे हे काही योग्य नाही, असा सल्लाही आठवले यांनी अभिजित दिपके यांना दिला आहे. आंदोलनांनी सरकार बदलता येणार नाही, असंही आठवले म्हणाले आहेत.

एका महिन्याआधीही आठवलेंची दिपकेंना ऑफर  

खरंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे अभिजीत दिपकेंना सातत्याने स्वत:च्या आरपीआय पक्षात सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाही आठवलेंनी ऑफर दिली होती. त्यावेळी आठवले म्हणाले होते की, अभिजित दिपके हे आंबेडकरी विचारांचे तरुण आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या पक्षात यावे. कोणी चुकीचे काम करत असेल, तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, यावर आमच्या सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे दिपकेंनी सत्ताधारी पक्षात सामील व्हावे’. त्यावेळी दिपकेंनी रामदास आठवलेंची ऑफर नाकारली होती. एका महिन्यापूर्वी तुमच्यासाठी मी देशद्रोही होतो ना, असा सवाल दिपकेंनी आठवलेंना केला होता.

Follow Us
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो.....
Gokul Elections : गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो, के.पी. पाटील असं का म्हणाले?
अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह.....
Rain Update : अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह ह्या जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?