कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी छापेमारी; मोठं रॅकेट हाती लागण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्दमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य पथक आणि जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती.

कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी छापेमारी; मोठं रॅकेट हाती लागण्याची शक्यता
| Updated on: Jan 18, 2023 | 12:16 AM

कोल्हापूरः राज्यात आणि देशात पुरोगामी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी एकूण चार जणांना अटक केली असून बोगस डॉक्टर विजय कोळूस्कर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य पथक आणि जिल्हा पोलीस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात या कारवाईमुळे प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई होताच आणखी कोण कोण यामध्ये सहभागी आहेत का याचा तपास पोलीस करत असून चार जणांसह त्यांचे मोबाईल आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

मडिलगे आणि राधानगरी या दोन गावामध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्यानंतर या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे.

त्याचा तपास पोलीस करत आहेत. जिल्हा पोलीस पथकाकडून ही गर्भलिंग निदान करण्याचे यंत्र आणि गर्भपाताची औषधे सापडली असून याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्दमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य पथक आणि जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती.

त्यानंतर त्यांच्याविरोधा सापळा रचून विजय लक्ष्मण कोळस्कर यांच्याकडे गर्भलिंग तपासणीसाठी एका महिलेला पाठवण्यात आले, त्यानंतत कोळस्कर याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.

कोळस्कर याच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या घरातील सोनाग्राफी मशीन, गर्भनिरोधक गोळ्या आणइ इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.