AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारागृहातील अधिकाऱ्यांची सराईत गुन्हेगारासोबत दारू पार्टी, व्हिडीओ समोर येताच नाशिकमध्ये मोठी खळबळ

नाशिक आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारागृहातील अधिकाऱ्यांनीच सराईत गुन्हेगारासोबत पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता, हे प्रकरण आता या अधिकाऱ्यांना चांगलंच भोवलं आहे.

कारागृहातील अधिकाऱ्यांची सराईत गुन्हेगारासोबत दारू पार्टी, व्हिडीओ समोर येताच नाशिकमध्ये मोठी खळबळ
कारागृहातील अधिकाऱ्यांची सराईत गुन्हेगारासोबत दारू पार्टी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 25, 2026 | 3:23 PM
Share

नाशिक गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलंच चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आलं आहे. खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नाशिकच्या कारागृहातील अधिकाऱ्यांनी चक्क एका सराईत गुन्हेगारासोबत पार्टी केली आहे. या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सराईत गुन्हेगार गौरव मिश्रासोबत नाशिक कारागृहातील तीन अधिकारी  हिरालाल भामरे,अशोक मलवाड आणि जगदीश ढुमने पार्टी करताना आढळून आले आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता या अधिकाऱ्यांंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कारागृहाजवळील तुरुंग अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी ही पार्टी करण्यात आली होती.

नाशिक मध्यवर्ती कारागृहातील या तीन अधिकाऱ्यांना सराईत गुन्हेगार गौरव मिश्रासोबत पार्टी करणं चांगलंच भोवलं आहे. या तीन अधिकाऱ्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सात दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात नाशिक मध्यवर्ती कारागृहातील तीन अधिकारी  हिरालाल भामरे,अशोक मलवाड आणि जगदीश ढुमने यांच्यावर  कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र हा व्हायरल झालेला पार्टीचा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मध्यवर्ती कारागृह प्रशासनानाकडून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला आहे. हे तीनही अधिकारी 2024 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कार्यरत आहेत. आता त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण आहे गौरव मिश्रा? 

गौरव मिश्रा हा सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात 2024 मध्ये  फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.  त्यानंतर 21-11-2024 रोजी  त्याची जामिनावर मुक्तता झाली. याच आरोपीसोबत तुरुगातील अधिकाऱ्यांचा पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.   तोतया आयपीएस अधिकारी बनून अनेकांना गंडा घातल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे.  गौरव मिश्रा हा लाल दिव्याच्या गाडीसह शहरात पोलिस एस्कॉर्ट घेऊन फिरायचा, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट