विनाहेल्मेट चालकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर कारवाई; नाशिकमध्ये पोलीस आयुक्त आक्रमक

नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती करण्याचा चंगच पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी बांधला असून, आता विनाहेल्मेट दुचाकीधारकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

विनाहेल्मेट चालकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर कारवाई; नाशिकमध्ये पोलीस आयुक्त आक्रमक
नाशिकमध्ये कडक हेल्मट सक्ती करण्यात आली आहे.


नाशिकः नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती करण्याचा चंगच पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी बांधला असून, आता विनाहेल्मेट दुचाकीधारकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले होती. ही मोहीम चांगलीच चर्चेत राहिली. मात्र अनेक दुचाकीधारकांनी या मोहिमेला ठेंगा दिला. ते फक्त पंपावर हेल्मेट घालायचे. बाहेर आल्यानंतर काढायचे. अनेक पेट्रोल पंप चालकांनीही हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना पेट्रोल भरू दिले. त्यामुळे ही मोहीम अजून कडक करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आता फ्लाइंग स्कॉड तयार केले आहे. हे स्कॉड शहरात पाहणी करणार असून, विनाहेल्मेट दुचाकीधारकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

समुपदेनशाचा डोस दिला

पोलिस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचे समुपदेशनही सुरू केले होते. त्यानुसार दुचाकीस्वारांना लगेच दंडाची पावती नाही, तर दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस दिला. या उपदेशानंतर संबंधितांस एक प्रमाण पत्र देऊन सोडण्यात आले. आता या मोहिमेनंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आता आणखी एक नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत. सहा नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या मोहिमेस नाशिककर कसा प्रतिसाद देतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

दंडात अनेकदा तोडपाणी

विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यास पाचशे रुपये, ट्रिपल सीट प्रवास करण्यास दोनशे रुपये, सिग्नल तोडणाऱ्यास दोनशे रुपये, राँगसाइड वाहन चालवणाऱ्यास पोलिस हजार रुपयांचा दंड आकारतात. मात्र, अनेक नागरिक दंड भरण्यास टाळाटाळ करतात. दंड ठोठावला तरी पोलिसांशी हुज्जत घालतात. तर अनेक ठिकाणी पोलिसच तोडपाणी करून वाहनधारकाला सोडून देतात.

सर्रासपणे राँगसाइड प्रवास

नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच पुढाकार घेत पोलिस आयुक्तांनी ही हेल्मटसक्ती सुरू केली आहे.

इतर बातम्याः

साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच; संमेलन स्थळ नाशिक बाहेर नेल्याने प्रकाशकांमध्ये नाराजी

शिवसेना आमदार कांदे अन् अक्षय निकाळजे यांची पोलीस आयुक्त करणार चौकशी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI