AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे कोरोनामुक्त; पुन्हा कामाला सुरुवात

आदित्य ठाकरे यांना 20 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. | Aditya Thackeray

आदित्य ठाकरे कोरोनामुक्त; पुन्हा कामाला सुरुवात
आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री
| Updated on: Apr 13, 2021 | 9:08 AM
Share

मुंबई: राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Adtiya Thackeray) हे अखेर कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. यानंतर आदित्य ठाकरे पुन्हा कामालाही लागले आहेत. तसेच ते प्रसारमाध्यमांशीही संवाद साधण्याची शक्यता आहे. (Aditya Thackeray covid test report negative)

आदित्य ठाकरे यांना 20 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती तेव्हापासून आदित्य ठाकरे यांच्यावर उपचार सुरु होते. तर आदित्य ठाकरे यांची आई रश्मी ठाकरे यांनाही कोरोना झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, आता त्यांचा प्रकृतीही स्थिर आहे.

आदित्य ठाकरेंकडून कोव्हिड सेंटरचं लोकार्पण

मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वरळीतील नेहरु विज्ञान केंद्रात कोव्हिड आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. नेहरु सायन्स सेंटरमध्ये 150 रुग्णशय्या क्षमतेच्या समर्पित कोरोना आरोग्य केंद्रासह पोद्दार आयुर्वेदिक महाविज्ञालयात 225 बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड काळजी केंद्र आहे. पर्यावरण मंत्री आणिमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.

कोणाकोणाची उपस्थिती

मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, जी/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष दत्ता नरवणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, नगरसेविका हेमांगी वरळीकर, नगरसेवक संतोष खरात, उपआयुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, नेहरु विज्ञान केंद्रातील कोविड रुग्णालय उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला नयन समुहाने सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य केले आहे.

संबंधित बातम्या :

नेहरु सायन्स सेंटरमध्येही कोरोना आरोग्य केंद्र, आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ, मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

बीएमसीकडून मुंबईत कोरोना लसीकरणाचं वेळापत्रक जाहीर, तुम्हाला कधी-कुठं लस घेता येणार?

(Aditya Thackeray covid test report negative)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.