बीएमसीकडून मुंबईत कोरोना लसीकरणाचं वेळापत्रक जाहीर, तुम्हाला कधी-कुठं लस घेता येणार? वाचा…

बीएमसीकडून मुंबईत कोरोना लसीकरणाचं वेळापत्रक जाहीर, तुम्हाला कधी-कुठं लस घेता येणार? वाचा...
BMC Corona Vaccine

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत कोविड-19 लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 09, 2021 | 10:26 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत कोविड-19 लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार शनिवारी (10 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 आणि रविवारी (11 एप्रिल 2021) सकाळी 9 ते 5 या वेळेत होणार आहे. महानगरपालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये दोन दिवस हे लसीकरण सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 10 एप्रिल, 11 एप्रिल आणि 12 एप्रिल 2021 या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. असे असले तरी, लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध झाला, तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे (Corona Vaccination Schedule timetable in Mumbai for two days amid vaccine shortage).

कोविड-19 लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने खासगी लसीकरण केंद्र बंद

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. परंतु कोविड-19 लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 10,11 आणि 12 एप्रिल 2021 या तीन दिवशी लसीकरण होणार नाही.
महानगरपालिकेला आज (9 एप्रिल 2021) रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा मिळणार आहे. अधिक प्रमाणात लससाठा उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन संचालित केंद्रांमध्येच पुढील दोन दिवस लसीकरण

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन संचालित लसीकरण केंद्रांमध्ये शनिवारी (10 एप्रिल 2021) रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत पहिले सत्र राहणार आहे. ज्या केंद्रांमध्ये नियमित दोन सत्रांचे नियोजन होत असेल अशा लसीकरण केंद्रांत दुसरे सत्र रात्री 8 वाजेपर्यंत कार्यान्वित राहिल. यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसुतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. रविवारी (11 एप्रिल 2021) रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण केंद्र कार्यान्वित राहतील.

शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयातील लसीकरणाचे वेळापत्रक

  • शनिवारी (10 एप्रिल 2021 रोजी) दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत पहिले सत्र
  • रविवारी (11 एप्रिल 2021 रोजी) सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण
  • खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 10,11 आणि 12 एप्रिल 2021 या तीन दिवशी लसीकरण होणार नाही
  • लससाठा अधिक उपलब्ध झाल्यास खासगी केंद्रातही पुन्हा सुरु करणार लसीकरण

हेही वाचा :

Corona Vaccine in Mumbai : मोठी बातमी : मुंबईतील महत्वाच्या लसीकरण केंद्रावरील लस संपली, बीएमसी अधिकाऱ्याची माहिती

Mumbai Local : मोठी बातमी, मुंबई लोकलवर पुन्हा निर्बंध घालण्याच्या हालचाली

हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे, वाचा सुधारित नियम

व्हिडीओ पाहा :

Corona Vaccination Schedule timetable in Mumbai for two days amid vaccine shortage

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें