नेहरु सायन्स सेंटरमध्येही कोरोना आरोग्य केंद्र, आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

नेहरु सायन्स सेंटरमध्येही कोरोना आरोग्य केंद्र, आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण
वरळीत नेहरु सायन्स सेंटरमध्येही कोरोना आरोग्य केंद्र

नेहरु विज्ञान केंद्र, पोद्दार महाविद्यालय आणि एनएससीआय मिळून एकूण 1175 बेड्स उपलब्ध होतील. (COVID Worli Nehru Science Centre)

अनिश बेंद्रे

|

Apr 13, 2021 | 8:26 AM

मुंबई : मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वरळीतील नेहरु विज्ञान केंद्रात कोव्हिड आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. नेहरु सायन्स सेंटरमध्ये 150 रुग्णशय्या क्षमतेच्या समर्पित कोरोना आरोग्य केंद्रासह पोद्दार आयुर्वेदिक महाविज्ञालयात 225 बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड काळजी केंद्र आहे. पर्यावरण मंत्री आणिमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. (Aditya Thackeray inaugurates COVID Health Centre at Worli Nehru Science Centre)

1175 बेड्स उपलब्ध होणार

वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमता देखील 500 वरुन वाढवून आता 800 इतकी करण्यात येत आहे. ही कार्यवाही येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे नेहरु विज्ञान केंद्र, पोद्दार महाविद्यालय आणि एनएससीआय मिळून एकूण 1175 बेड्स उपलब्ध होतील.

70 टक्के बेड्स ऑक्सिजन पुरवठ्यासह

कोव्हिड बाधितांवरील उपचारांसाठी यामुळे मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णशय्यांमधील एकूण 70 टक्के रुग्णशय्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

(Aditya Thackeray inaugurates COVID Health Centre at Worli Nehru Science Centre)

कोणाकोणाची उपस्थिती

मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, जी/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष दत्ता नरवणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, नगरसेविका हेमांगी वरळीकर, नगरसेवक संतोष खरात, उपआयुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, नेहरु विज्ञान केंद्रातील कोविड रुग्णालय उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला नयन समुहाने सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य केले आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ, मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

बीएमसीकडून मुंबईत कोरोना लसीकरणाचं वेळापत्रक जाहीर, तुम्हाला कधी-कुठं लस घेता येणार?

(Aditya Thackeray inaugurates COVID Health Centre at Worli Nehru Science Centre)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें